धक्कादायक! बारामतीत एका बैलासाठी वाद अन् गोळीबार; तरुणाचा मृत्यू

Last Updated:

फलटण येथील रणजीत निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते . उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

गोळीबारात तरुणाचा मृत्यू
गोळीबारात तरुणाचा मृत्यू
बारामती (जितेंद्र जाधव, प्रतिनिधी) : बारामती तालुक्यातील निंबुत येथे शर्यतीच्या बैलावरून रात्री गोळीबाराची घटना घडली. यामध्ये फलटण येथील रणजीत निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते . उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, मुलगा गौरव काकडे आणि शेतमजूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर, गौतम काकडे फरार आहे.
निंबुत येथील गौतम काकडे यानी फलटण येथील ज्ञानज्योती अकॅडमी चालवणारे रणजीत निंबाळकर यांच्याकडून अनेक शर्यती जिंकलेला सुंदर नावाचा शर्यतीचा बैल 38 लाख रूपयांना खरेदी केला होता. यापैकी पाच लाख रूपये अ‍ॅडव्हान्स म्हणून दिले होते. उरलेले पैसे घेण्यासाठी निंबाळकर काकडे यांच्या घरी गेले होते. मात्र, पैसे न देता जबरदस्तीने काकडे सह्या मागू लागला. यावर पैसे द्या नाहीतर बैल घेऊन जाणार असं रणजीत निंबाळकर म्हणाले, या वादातून हा गोळीबार झाला होता.
advertisement
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांच्या रिव्हॉल्व्हरमधून मुलगा गौरव काकडे याने रणजीत निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी झाडली. यामध्ये रणजीत निंबाळकर गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. परंतु यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
advertisement
या प्रकरणी पोलिसांनी गौरव काकडे, सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि शेतमजूर याला अटक केली आहे. तर, गौतम काकडे फरार आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
धक्कादायक! बारामतीत एका बैलासाठी वाद अन् गोळीबार; तरुणाचा मृत्यू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement