ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील एका मॉलजवळील वेलनेस अँड हेअलिंग स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती हार्मनी फाऊंडेशन या सामाजिक संस्थेनं पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे गुरुवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं छापेमारी केली. यावेळी पोलिसांना घटनास्थळी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचं दिसून आलं. या प्रकरणी पोलिसांनी स्पा सेंटर चालवणाऱ्या दोन महिलांसह एका पुरुष एजंटला अटक केली.
advertisement
हे तिन्ही आरोपी सात महिलांकडून याठिकाणी वेश्या व्यवसाय करून घेत होते. ज्यावेळी पोलिसांनी छापेमारी केली तेव्हा काही ग्राहक या महिलांसोबत नको त्या अवस्थेत आढळून आले. या प्रकारानंतर पोलिसांनी सात महिलांची सुटका केली. यातील एक तरुणी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याबाबतचे पुरावे आता पोलिसांकडून गोळा केले जात आहेत. शिवाय या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग असेल तर त्यांना शोधून लवकरच अटक केली जाईल, असं आश्वासन वरिष्ठ पोलिसांनी दिलं.
याप्रकरणी पोलिसांनी बीएनएस आणि मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यातील एका मॉल परिसरात अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी अशाप्रकारे सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
