आई मी उपवास धरलाय...
23 मे रोजी दुपारी 1.43 वाजता सोनमने तिच्या सासू उमा रघुवंशी यांना इंदूरमध्ये फोन केल्याचं आढळलं. सासूने सोनमला विचारलं होतं की तिनं जेवण केलं आहे की नाही, ज्यावर सोनमने उत्तर दिलं की आई मी उपवास करत आहे. एसआयटीच्या पथकाने शिप्रा होमस्टेच्या संचालकाची चौकशी केली तेव्हा त्यानं सांगितलं की सोनम 23 मे रोजी परतली होती आणि तिनं चांगलं जेवण केलं होतं. त्यामुळे सोनम धडधडीत खोटं बोलत होती, हे स्पष्ट झालं आहे. दोघांच्या बोलण्यात विरोधाभास दिसल्याने संशय व्यक्त केला जातोय.
advertisement
अर्धा तासानंतर राजाची हत्या
राजाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूची वेळ आणि सोनमच्या सासूशी झालेल्या संभाषणाच्या वेळेवरून असेही दिसून आले की सोनमने तिच्या सासूशी बोलल्यानंतर अर्धा तासानंतर राजाची हत्या करण्यात आली. तसेच हनिमूनला जाणारे जोडपे अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचे हनिमूनचे फोटो अपलोड करतात. पोलिसांनी दोघांचेही अकाउंट शोधले तेव्हा त्यांचा एकही फोटो सापडला नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला आहे.
सासू आणि सोनममध्ये काय चर्चा झाली?
सासू : "बेटा, कशी आहेस तू? मी साबुदाणा खिचडी बनवत होते, तेव्हा तुझी आठवण आली की आज माझ्या सुनेची एकादशी आहे. उपवास केला आहे ना?"
सोनम: "हो, आई, मी यांना स्पष्ट सांगितलं आहे की मी फिरण्याच्या नादात माझी एकादशी मोडणार नाही."
सासू : "बेटा, तू एवढी धापा का टाकत आहेस? काहीतरी खाऊन घे, उपवासाचं मिळाला का?"
सोनम: "आई, इथं काहीही नीट खाण्या-पिण्यासारखं नाहीये. आत्ता एका ठिकाणी कॉफी प्यायली, तर असं वाटलं की काय पितोय कोण जाणे."
सासू : "बेटा, आत्ता तू कुठे आहेस?"
सोनम: "आई, हे फिरण्यासाठी जंगलात घेऊन आले आहेत. खूप उभी आणि कठीण ट्रेक आहे."
सासू : "मग तुम्ही तिथं काय बघायला गेला होता? खालूनच बघून घेतलं असतं."
सोनम: "धबधबा बघायला गेलो होतो."
सासू : "श्वास फुलतोय ना?"
सोनम: "हो, दम लागतोय. नंतर बोलते मी."
सासू : "काही हरकत नाही बेटा, तुझा फोन लागला, आता आम्ही निश्चिंत आहोत. तू उपवासाचं खाऊन घे."
दरम्यान, जेव्हा सोनमने हनिमूनसाठी स्वतः तिकिटं बुक केली आणि राजाला याबद्दल सांगितलं तेव्हा तोही सहलीला जाण्यास तयार झाला. सासू उमा म्हणाली की सोनमने परतीचे तिकीट बुक केले नव्हते. त्यामुळे हनिमूनला जाण्याआधीच सोनमने प्लॅन केला होता का? असा सवाल विचारला जात आहे.