20 वर्षांचा मुलगा असं कसं करू शकतो?
राजा रघुवंशी खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी राज कुशवाहाच्या आईने आपल्या मुलाला निर्दोष सिद्ध करण्याची मागणी केली आहे. "कृपया माझ्या मुलाला निर्दोष सिद्ध करा. 20 वर्षांचा मुलगा असे कसे करू शकतो? तुम्ही सर्वजण एका आईचे दुःख समजू शकता. तोच आमच्या सर्वांची काळजी घेणारा एकुलता एक आहे," असे म्हणत त्यांनी पोलिसांना आणि न्यायव्यवस्थेला भावनिक आवाहन केलं आहे. तसेच राजच्या बहिणीने देखील आरोप फेटाळून लावले आहेत.
advertisement
राज सोमनला दिदी म्हणायचा...
सोनमसह राजा रघुवंशीची हत्या करणाऱ्या राज कुशवाहाच्या बहिणीचा दावा आहे की माझा भाऊ हे करू शकत नाही. बहिणी आणि आईने मीडियाला सांगितले की राजला कटाचा भाग म्हणून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो हे अजिबात करू शकत नाही. सोनमसोबतच्या रिलेशनशिपमध्ये असल्याबद्दल विचारले असता बहिणी म्हणाली, 'माझा भाऊ तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये कसा असू शकतो? तो तिला दीदी म्हणायचा. दोघांमध्ये नोकर-मालकाचे नातं होतं, असं राजची बहिण म्हणाली.
विपिन रघुवंशीला डाऊट
दरम्यान, राजा रघुवंशी यांचे भाऊ विपिन रघुवंशी यांनी एक मोठा आरोप केला आहे. विपिन रघुवंशी यांच्या मते, आम्हाला खात्री आहे की या प्रकरणात ५ हून अधिक आरोपी आहेत. सोनमने आत्मसमर्पण केले तेव्हा तिने तिच्या भावाला फोन करून सांगितले की कोणीतरी तिला इथे सोडून गेले आहे.