राजाच्या हत्येबद्दल शिलाँग पोलिसांनी काय काय सांगितले?
सोनम आणि राज कुशवाह यांनी मिळून हत्येची योजना आखली. राजने यासाठी कंत्राटी किलर नेमले. राज शिलाँगला आला नाही. तो फक्त सोनमसोबत फोनवरून संपर्कात होता. तीन कंत्राटी किलर शिलाँगमध्येच उपस्थित होते. आकाश, विशाल आणि आनंद यांना सुपारी देण्यात आली. यानंतर सर्वजण चेरापुंजी येथे पोहोचले. सोनमने राजा रघुवंशीला जाणूनबुजून एका निर्जन रस्त्यावर नेले. तिघांनी मिळून खून केला. त्यानंतर, आकाश, विशाल, आनंद आणि सोनम शिलाँगहून गुवाहाटीला गेले. एक दिवस गुवाहाटीत राहिले. पुन्हा तिथून बाहेर पडले. आणि वेगळे झाले.
advertisement
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू होता, तेव्हा पोलिसांना कळले की सोनम जिवंत आहे आणि राज रघुवंशीच्या हत्येत तिचा हात असू शकतो. सोनमच्या कॉल डिटेल्सवरून पोलिसांना कळले की सोनम राज कुशवाहाच्या संपर्कात होती. दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखत होते आणि दोघांचेही प्रेमसंबंध होते.
तांत्रिक देखरेख आणि अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही काढल्यानंतर, पोलिस प्रथम ललितपूरला पोहोचले, जिथून आकाश राजपूतला अटक करण्यात आली. त्यानंतर विशाल आणि राज कुशवाहाला इंदोर येथून अटक करण्यात आली. सोनमने गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केले. पाचवा आरोपी आनंदला सागर येथून अटक करण्यात आली. एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. सर्वांना शिलाँगला आणले जाईल. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर, सर्वांचा रिमांड घेतला जाईल.
जर सोनमचा दोष असेल तर तिला....
सोनम लग्नाच्या आधीपासून माझ्याशी चांगले बोलायची. कधी भेटली तर आई आई म्हणत गळ्यात पडायची. लग्नाच्या दरम्यान राजा आणि सोनममध्ये काहीसे बोलणे कमी झाले होते. त्यासाठी मी सोनमच्या आईला 'दोघांना भेटू द्या' अशी विनंती केली होती. मात्र सोनमच्या बाबांना लग्नाआधी भेटलेले आवडणार नाही, असे सांगत त्यांनी नकार दिला. सोनम असे करेन असे आम्हाला कधीही वाटले नाही. आताही वाटत नाही. परंतु पोलीस चौकशीत जर सोनमचा दोष आढळला तर तिला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे राजाची आई म्हणाली.