इंदूरहून ट्रेनने आधी गुवाहाटीला...
राजावर पहिला वार विशाल उर्फ विक्की ठाकूरने केला होता. आरोपींनी चौकशीत सांगितले की, ते इंदूरहून ट्रेनने आधी गुवाहाटीला गेले आणि तिथून शिलॉंगला पोहोचले. इंदूरहून थेट ट्रेन नसल्यामुळे, त्यांना मेघालयला पोहोचण्यासाठी अनेक ट्रेन्स बदलाव्या लागल्या, अशी माहिती क्राइम ब्राँचने दिली आहे.
हत्याकांडावेळी सोनम उपस्थित
advertisement
राज कुशवाह या संपूर्ण काळात इंदूरमध्येच होता, पण त्याने विशाल, आकाश आणि आनंद या तीन आरोपींना मेघालयमधील खर्चासाठी अंदाजे 40-50 हजार रुपये दिले होते. हत्याकांडाच्या वेळी सोनम रघुवंशी देखील तिथे उपस्थित होती. आरोपींनी सांगितले की, सोनम आपल्या पती राजाला मरताना बघत होती. यानंतर आरोपींनी राजाचा मृतदेह खोल दरीत फेकून दिला.
अजून ठोस पुरावा नाही
इंदूर क्राईम ब्रांचच्या एसीपी पूनम चंद यादव यांनी सांगितलं की, या प्रकरणात सोनम इंदूरला परत आली होती की नाही, याची पुष्टी मेघालय पोलीसच करू शकतील. त्यांनी सांगितले की, या संदर्भात इंदूर पोलिसांना अजून कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. इंदूरचा रहिवासी असलेल्या राजा रघुवंशीने सोनम रघुवंशीशी हत्येच्या 12 दिवस आधी लग्न केले होते. ते मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेले होते. त्यानंतर 23 मे रोजी ते मेघालयच्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा भागात होते, जिथून ते बेपत्ता झाल्याचे सांगितले जात होते. राजा रघुवंशीचा मृतदेह 2 जून रोजी एका दरीत सापडला होता.
कपड्यावर हत्येचे डाग
एसीपी क्राईम ब्रांचने सांगितले आहे की, आरोपी विशालने हत्याकांड करताना जे कपडे घातले होते, ते विशालच्या घरातून जप्त करण्यात आले आहेत. ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जातील, जेणेकरून रक्ताचे डाग राजाचे आहेत की नाही याची पुष्टी होऊ शकेल. सोनम रघुवंशीला सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथून ताब्यात घेण्यात आले होते. तिने चौकशीत सांगितले की, तिने मदतीसाठी एका ढाबा मालकाशी संपर्क साधला. तिला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, त्यानंतर ती बेशुद्ध पडली आणि ती गाझीपूरला कशी पोहोचली हे तिला आठवत नाही, असा दावा तिने केला.