पती सांगायचा की, माझ्या मृत्यूनंतर 5 तासांनी होणार जिवंत
घर, पेन्शन आणि प्रॉपर्टीच्या लालसेतून पत्नीनेच पतीच्या हत्येचा कट रचला होता. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. मृत जॉर्ज (George) अनेकदा पत्नीला सांगायचे की, एका ज्योतिषाने त्यांना सांगितले आहे की, मृत्यूनंतर 5 तासांनी ते पुन्हा जिवंत होऊ शकतात. हे लक्षात घेऊन आरोपी पत्नीने त्यांचा मृतदेह तब्बल 5 तास खोलीतच ठेवला होता. आरोपी पत्नी बिट्टीने (Bitti) पोलीस चौकशीत हे सर्व सांगितलं.
advertisement
पत्नी म्हणाली, नवरा बाथरूममध्ये पाय घरून पडला अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीने प्रियकराला हत्येसाठी 10 लाख रुपयांची सुपारी दिली होती. मृत जॉर्ज यांचं वय 65 आणि पत्नी बिट्टीचं वय 32 वर्ष होतं, अशीही माहिती मिळाली आहे. पत्नी पतीमुळे खूप त्रस्त होती. पोलिसांनी सुरुवातीच्या चौकशीत पत्नीने सांगितलं होतं की, बाथरुममध्ये पाय घसरून पडल्यामुळे पतीचा मृत्यू झाला. मात्र, पोलीस तपासात हत्येचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे.
हे ही वाचा : सिनेमा स्टाईल मर्डर! 'रईस' सिनेमा पाहून चिरला मित्राचा गळा, बनवला व्हिडीओ अन् पाठवला भावाला, पुढे...
हे ही वाचा : सातव्या फेरीला नवऱ्याचा लग्नास नकार, 56 लाख खर्चूनही मोडलं लग्न, पण का? वाचा सविस्तर