TRENDING:

ट्रेनी डॉक्टरचा आधी गळा दाबला, नंतर बलात्कार; त्या रात्री संजय रॉयने काय केलं? पॉलीग्राफ टेस्टमध्ये खुलासा

Last Updated:

ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयची पॉलीग्राफ टेस्ट करण्यात आली. याचा रिपोर्ट आता समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्ली : कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयची पॉलीग्राफ टेस्ट करण्यात आली. याचा रिपोर्ट आता समोर आला आहे. यात त्याने बलात्कार आणि हत्येआधी काय काय केलं, त्याची माहिती समोर आलीय. रिपोर्टनुसार संजय रॉयने पॉलीग्राफ टेस्टवेळी त्याचा गुन्हा मान्य केलाय. हत्येच्या रात्री त्यानं काय केलं हे सविस्तर सांगितलंय.
News18
News18
advertisement

संजय रॉय ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करण्याच्या आधी कोलकात्यातील दोन रेड लाइट एरियामध्येही गेला होता. तिथे तो फक्त फिरून आला असंही त्याने सांगितलं. याशिवाय एका मुलीची छेड काढल्याचंही मान्य केलं. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. संजय रॉयने त्या रात्री गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल केला होता आणि तिच्याकडे न्यूड फोटोही मागितले होते.

ट्रेनी डॉक्टरवर ८ ऑगस्टच्या रात्री बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्या रात्री संजय रॉय मित्रासोबत मित्राच्या भावाबद्दल माहिती घेण्यासाठी आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचला होता. त्याच्या भावाला रुग्णालयात दाखल केलं होतं. रात्री सव्वा अकरा वाजता रॉय आणि त्याचा मित्र रुग्णालयातून निघाले. दारु पिण्यासाठी ते गेले आणि रस्त्याच्या कडेलाच प्यायला बसले.

advertisement

doctor suicide case : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीनं आयुष्य संपवलं; तरी म्हणाली, 'चितेवर तू...'

दारु प्यायल्यानंतर संजय रॉय आणि त्याचा मित्र कोलकात्यातील रेड लाइट एरिया सोनागाछी इथं गेले. तिथून ते दक्षिण कोलकात्यातील दुसरा रेड लाइट एरिया असलेल्या चेतला इथं गेले. चेतला भागात जाताना दोघांनी एका मुलीची छेडही काढली होती. चेतलामध्ये संजय रॉयचा मित्र एका महिलेसोबत गेला. तेव्हा संजय रॉय बाहेरच गर्लफ्रेंडसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत राहिला.

advertisement

संजय रॉय आणि त्याचा मित्र तिथून पुन्हा आरजी कर मेडिकल कॉलेजला परतले. रॉय या ठिकाणी चौथ्या मजल्यावर ट्रॉमा सेंटरला गेला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं की, रॉय तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सेमिनार हॉलच्या कॉरिडोरमध्ये जात आहे. रॉय सेमिनार हॉलमध्ये जिथं पीडिता झोपली होती तिथे गेला. तिथे पीडितेचा गळा दाबला आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. संजय रॉय यानंतर कोलकाता पोलीस अधिकारी असलेल्या अनुपम दत्ता यांच्या घरी जाऊन झोपला.

advertisement

'Dear Aaho...' नवऱ्याने छळलं तरी प्रेम नाही संपलं, डॉ. प्रतीक्षानं कविता लिहून घेतला गळफास

आरजी कर मेडिकल कॉलेजच्या सेमीनार हॉलमध्ये ३१ वर्षीय ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानंतर दुसऱ्या दिवशी संजय रॉयला अटक करण्यात आली होती. महिला डॉक्टरच्या शेजारी एक ब्लुटूथ डिव्हाइस आढळलं होतं, त्यावरून संजय रॉयला अटक केली गेली.

मराठी बातम्या/क्राइम/
ट्रेनी डॉक्टरचा आधी गळा दाबला, नंतर बलात्कार; त्या रात्री संजय रॉयने काय केलं? पॉलीग्राफ टेस्टमध्ये खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल