Crime News : 'Dear Aaho...' नवऱ्याने छळलं तरी प्रेम नाही संपलं, डॉ. प्रतीक्षानं कविता लिहून घेतला गळफास
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
डॉ. प्रतीक्षाने सुसाइड नोट लिहिता लिहिता लिहिली कविता... 'Dear Aaho कडे एकच अपेक्षा...'
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : डॉ. प्रतीक्षाने नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून आपलं आयुष्य संपवलं. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच तिने हे टोकाचं पाऊल उचलल्यानं कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तीने सात पानांची सुसाईड नोट लिहून आपलं आयुष्य संपवलं. या सुसाईड नोटमध्ये तिने हा निर्णय का घेतला यामागचं कारणही सांगितलं आहे.
पतीच्या मानसिक त्रासाला कंटाळून तिने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. तिने सुसाईड नोट तब्बल सात पानांची लिहिली आहे. यात तिने आपल्या मनातल्या सगळ्या चार महिन्यांच्या भावना व्यक्त केला आहे. नवऱ्याने इतकं छळलं, मानसिक त्रास दिला तरी तिचं त्याच्यावरचं प्रेम कमी झालं नाही. फक्त तिची अपेक्षा एकच आहे जी तिने या कवितेतून मांडली आहे. काय म्हणाली प्रतीक्षा....
advertisement
To Dear Aaho,
माझ्या मनीचे दुःख सारे कधी तु जाणवलेच नाही
पावसात लपणारे अश्रू माझे तुला कधी दिसलेच नाही.
तुझ्याचसाठी हुरहुरणाऱ्या हृदयास तु पहिले नाही
तुझ्यासाठी झटणाऱ्या हातांना कधी चुंबले नाही
नशीब बांधले होते आपले, नाही त्यात षड्यंत्र काही
advertisement
हा पण प्रेम होते आणि आहे (हे लिहून वाक्य खोडलं आहे)
दोष याला त्याला देण्यात कसला काही अर्थ नाही
मनीचे भाव मनाचे घाव याला काही महत्त्व नाही
तुझ्या नजरेत मी फक्त स्त्री आणखी काही नाही.
तुझ्याचपासून सुख माझे तुझ्याचसाठी सर्व काही
मी स्वत:ला हरवून आले, याचे मला दुःख नाही
advertisement
तू फक्त जपावे मला याहून जास्त अपेक्षा नाही
तुझ्यासाठी मी सगळं करेल यात काही शंका नाही
तुझ्याशी भांडता भांडता तुझ्यात किती गुंतले कळलेच नाही
तुझ्या प्रेमात पडताना मी स्वत: ला कधी रोखले नाही
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
August 26, 2024 1:46 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : 'Dear Aaho...' नवऱ्याने छळलं तरी प्रेम नाही संपलं, डॉ. प्रतीक्षानं कविता लिहून घेतला गळफास