Chhatrapati Sambhaji Nagar doctor suicide case: डॉक्टर असूनही नवऱ्याचा इतका त्रास का सहन करत राहिली प्रतीक्षा? सुसाईड नोटमधून समोर आलं कारण

Last Updated:

Chhatrapati Sambhaji Nagar doctor suicide case: 'कामाच्या ठिकाणीही तुम्ही...', डॉक्टर प्रतीक्षाच्या नवऱ्याने कळसच गाठला, पत्रातून धक्कादायक माहिती समोर

छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : गायनॅकलॉजिस्ट होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या डॉ. प्रतीक्षाने धक्कादायक निर्णय घेतला. लग्नाला अवघे चार महिने झाले होते. त्याच चार महिन्यात इतक्या भयंकर असा तिला मानसिक त्रास देण्यात आला की तिने थेट आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. तिने टोकाचं पाऊल उचललं आणि आपलं आयुष्य संपवलं. लग्नाच्या चार महिन्यांतच तिने जवळपास 7 पानांचं भावनिक पत्र लिहून टोकाचं पाऊल उचललं.
या पत्रातून तिने नवरा आपल्याला नेमका कसा त्रास देतो, कसा मानसिक छळ करतो याची माहिती तिने दिली आहे. तिने जे सांगितलं हे मन हादरवून टाकणारं होतं. ती कोणत्या परिस्थितून चार महिने गेली असेल हे पत्र वाचल्यावर अंगावर अक्षरश: शहारे येतात.
प्रतीक्षा म्हणते, मला जाब विचारला जातो, माझ्यावर नजर ठेवायला मित्रांना कॉल करणार होतो आता तुला पाहायला असं सांगतात. म्हणजे माझ्यावर तुमचा किती अविश्वास आहे ते लगेच दिसतं. मी कामाच्या ठिकाणीसुद्धा तुमच्या धाकात असते. सतत कुठे आहेस, तिथे काय करतेस, एवढा वेळ का झाला, कॉल नाही केला, बोलायचं नाहीय का असं सतत बोलून त्रास दिला.
advertisement
माहेरच्यांना काहीही बोलतात, फर्निचरच्या पैशांवरुन भांडतात, जेव्हा मला NEET PG द्यायची होती तेव्हा अभ्यास करू दिला नाही. मी केलेल्या चुका मला ऐकवून माझी मेंटल हॅरासमेंट केली. कामात असताना कॉल केला नाही म्हणून रागवतात, नंतर बोलते म्हटल्यावर चिडतात. दिलेला त्रास घरी सांगितलास तर बघ आपलं नातं तुटेल अशी रोज धमकी द्यायचे आणि शांत बसवलं.
advertisement
तुमच्या overpassesiveness आणि dominating nature मुळे मला खूप प्राप्त झालाय. माणसान एवढे dominating नसावं. जगायचं होतं मला पण आपल्यात लग्नापासून काहीच जमलं नाही. मला कधी समजून घेतलं नाही, मला फक्त restrictions मध्ये ठेवलं. ह्याच त्रासाला कंटाळून मी स्वतःला संपवतेय. गोड आहात दिसायला, गोडच रहा…. आणि कधी थोडं पण प्रेम केलं असेल तर मला tight hug करुनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा.
advertisement
तुमचीच, प्रतीक्षा
माझा मोबाईल तुमच्यासाठी नेहमी ओपन राहिला. तुमचे fingerprints त्याला जोडलेले आहेत. तुमच्यावर मी लग्नाअगोदरचा पैसा खर्च केला तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. त्यावर तुमचा काहीच अधिकार नव्हता. तो पैसा मी माझ्या कष्टांनी आणि आईवडिलांच्या साथीने कमावला. मला खूप मोठी gynecologist व्हायचं होतं. पण सगळ पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आईवडिलांना. मी नसले तरी कुणाल आहे. पण तुम्ही एकटे आहात, त्यांना (सासू सासऱ्यांना) नीट सांभाळा, त्यांच्यावर चिडचिड नका करत जाऊ. I love You So Much. Bye…You are a free Bird now.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Chhatrapati Sambhaji Nagar doctor suicide case: डॉक्टर असूनही नवऱ्याचा इतका त्रास का सहन करत राहिली प्रतीक्षा? सुसाईड नोटमधून समोर आलं कारण
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement