Chhatrapati Sambhaji Nagar doctor suicide case : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीनं आयुष्य संपवलं; तरी म्हणाली, 'चितेवर तू...'

Last Updated:

नवऱ्याने लग्नानंतर 4 महिने डॉक्टर महिलेला इतका त्रास दिला की वाचून तुमचाही संताप होईल. त्याच्या छळाला कंटाळून तिनं जीवन संपवलं पण जाता जाताही ती त्याला असं काही म्हणाली की काळजात चर्रर्रर्र होईल.

महिला डॉक्टरचे डोळ्यात पाणी आणणारे शेवटचे शब्द
महिला डॉक्टरचे डोळ्यात पाणी आणणारे शेवटचे शब्द
अविनाश कनडजे, प्रतिनिधी/छत्रपती संभाजीनगर : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीने आपलं आयुष्य संपवल्याने एकच खळबळ उडाली. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच डॉक्टर महिलेनं आपलं आयुष्य संपवलं आहे. आत्महत्येपूर्वी या महिलेनं सुसाइड नोट देखील लिहिली आहे. सात पानांची ही सुसाईड नोट. डोळ्यात पाणी आणणारं ही चिठ्ठी.
प्रतीक्षा असं या महिला डॉक्टरचं नाव आहे. तिनं सुसाईड नोटमध्ये नवऱ्याने तिचा कसा आणि किती छळ केला हे सांगितलं. नवऱ्याने लग्नानंतर तिला 4 महिने इतका त्रास दिला की वाचून तुमचाही संताप होईल. पण इतकं छळूनही तिचं नवऱ्यावरील प्रेम कमी झालं नाही. त्याच्याबाबत तक्रार करताना तिनं त्याच्यावरील आपलं प्रेमही व्यक्त केलं आहे. त्याच्या छळाला कंटाळून तिनं जीवन संपवलं पण जाता जाताही ही तिनं असं काही म्हटलं की त्याने काळजात चर्रर्रर्र होईल.
advertisement
प्रतीक्षाने सात पानी चिठ्ठीच्या शेवटच्या पानात म्हटलं...
अहो, तुमच्या overpassesiveness आणि dominating nature मुळे मला खूप प्राप्त झालाय. माणसान एवढे dominating नसावं. जगायचं होतं मला पण आपल्यात लग्नापासून काहीच जमलं नाही. मला कधी समजून घेतलं नाही, मला फक्त restrictions मध्ये ठेवलं. ह्याच त्रासाला कंटाळून मी स्वतःला संपवतेय. गोड आहात दिसायला, गोडच रहा.... आणि कधी थोडं पण प्रेम केलं असेल तर मला tight hug करुनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा.
advertisement
तुमचीच, प्रतीक्षा
नवऱ्याने इतका जाच केल्यानंतरही मृत्यूनंतर चितेवर त्याने आपल्याला घट्ट मिठी मारावी अशी इच्छा तिनं व्यक्त केली आहे.
प्रतीक्षाने सुसाईड नोटमध्ये आणखी काय काय म्हटलं?
Dear अहो,
खूप प्रेम केलं हो तुमच्यावर, जिवापाड केलं. स्वतः ला विसरून गेले तुमच्यासाठी. माझ्यासारख्या हसत्याखळत्या मुलीला त्रास देऊन देऊन मंद करून टाकलं तुम्ही. एका स्वावलंबी, ambitious मुलीला dependent बनवलं तुम्ही. खूप स्वप्नं घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी. की हे मला खूप जीव लावतील, काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील, आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा हवा होता ना त्याचीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं.आज ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती तर. तुम्ही सांगितलं म्हणून सगळं सोडलं. मी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आई-वडिलांशी भावाशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांनाही नव्हते बोलत जास्त. पण तरीही तुमचं पोट भरलं नाही. मोबाईल बदल म्हणाले बदलला, नंबर बदल म्हणून वाद घातले त्यासाठी पण तयार झाले. पण तुमचे doubts काही संपतच नाही. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेतात. पण देवाशपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते, आहे आणि राहिल. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही.
advertisement
मला जाब विचारला जातो. माझ्यावर नजर ठेवायला मित्रांना call करणार होतो. आता तुला पाहायला असं सांगतात. म्हणजे माझ्यावर तुमचा किती अविश्वास आहे लगेच दिसतो. मी कामाच्या ठिकाणीसुद्धा तुमच्या धाकात असते. सतत कुठे आहेस तिथं काय करतेय,
एवढा वेळ का झाला, कॉल नाही केला, बोलायचं नाहीये का? असं बोलून त्रास दिला.
advertisement
माहेरवाल्यांना काहीपण बोलतात. फर्निचरच्या पैशावरून भांडतात. जेव्हा मला Neet PG द्यायची होती तेव्हा अभ्यास करू दिला नाही. स्वत:ही केला नाही. मी केलेल्या चुका मला रोज ऐकवून माझी Mental harrasment केली तुम्ही. कामात असताना कॉल उचलला नाही म्हणून रागावतात, नंतर बोलते म्हटल्यावर पण चिडतात. हे स्वतः आज समाधान भाऊसमोर झालं. मला दिलेला त्रास घरी सांगितला तर बघ
advertisement
आपलं नातं तुटेल या धमकीनं मला नेहमी शांत बसवलं. माझ्याकडून आता सहन होत नाहीये हो.
एवढा जीव लावून तुमच्या घरच्यांना जीव लावून तुम्ही माझ्याविषयी त्यांच्या मनात खूप वाईट गोष्टी पेरल्या. मी त्यांना मनापासून जपलं. सासू-सासऱ्यांची काळजी घेतली. कधी उलट - सुलट बोलली नाही. त्यांनी पण मला जीव लावला. पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते
advertisement
असं म्हटलं.  मला ते फार वाईट वाटलं म्हणून देवाला जाताना मम्मीपप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं. माझ्यात अन् प्रिया दीदीत वाद घालून दिले.
माझा मोबाईल तुमच्यासाठी नेहमी ओपन राहिला. तुमचे fingerprints त्याला जोडलेले आहेत. तुमच्यावर मी लग्नाअगोदरचा पैसा खर्च केला तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. त्यावर तुमचा काहीच अधिकार नव्हता. तो पैसा मी माझ्या कष्टांनी आणि आईवडिलांच्या साथीने कमावला. मला खूप मोठी gynecologist व्हायचं होतं. पण सगळ पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आईवडिलांना. मी नसले तरी कुणाल आहे. पण तुम्ही एकटे आहात, त्यांना (सासू सासऱ्यांना) नीट सांभाळा, त्यांच्यावर चिडचिड नका करत जाऊ. I love You So Much. Bye...You are a free Bird now.
अहो, तुमच्या overpassesiveness आणि dominating nature मुळे मला खूप प्राप्त झालाय. माणसान एवढे dominating नसावं. जगायचं होतं मला, पण आपल्यात लग्नापासून काहीच जमलं नाही. मला कधी समजून घेतलं नाही, मला फक्त restrictions मध्ये ठेवलं. ह्याच त्रासाला कंटाळून मी स्वतःला संपवतेय. गोड आहात दिसायला, गोडच रहा.... आणि कधी थोडं पण प्रेम केलं असेल तर मला tight hug करुनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा.
तुमचीच, प्रतीक्षा
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Chhatrapati Sambhaji Nagar doctor suicide case : पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीनं आयुष्य संपवलं; तरी म्हणाली, 'चितेवर तू...'
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement