नेमकं प्रकरण काय?
ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये आर एस दमानिया इंग्लिश मेडियम स्कूल आहे. या शाळेत 14 ते 15 वर्षीय विद्यार्थिनींना शाळा प्रशासनाने अंगावरील सगळे कपडे काढायला भाग पाडून चेकींग केली आहे. शाळेच्या टॉयलेटमध्ये ब्लड पडलेले आढळल्याने मासिक पाळीच्या संशयाने 10 ते 12 मुलींचे अंतर्वस्त्रे काढून त्यांचं चेकींग करण्यात आलं आहे. या प्रकारामुळे संबंधित मुलींसह पालकांमध्ये संतापाची लाट उसळली.
advertisement
घटना समजताच पीडित मुलींच्या पालकांनी शाळेत जाऊन गोंधळ घातला. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक दबाव टाकला. ५वी ते १०वी इयत्तेतील विद्यार्थिनींना विवस्त्र करण्याचा लाजस्पद आणि केविलवाणा प्रकार केला.
या प्रकारामुळे काहीकाळ शाळेत पालक आणि शालेय प्रशासन यांच्यात गोंधळ झाला. सर्व पालक एकवटले असून त्यांनी R.S. दमानिया स्कूलच्या प्रिन्सिपलांवर जोपर्यंत गुन्हा दाखल करून त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत इथून हालणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. एका नामांकित शाळेत मुलींना अशाप्रकारे विवस्त्र केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.
