वाटेत अडवून नवऱ्याला केली मारहाण
मस्तूरी येथील अंकडीह गावातील रहिवासी अंकित माहिलांगे याचा विवाह 20 दिवसांपूर्वी भैंसाबोड गावातील रंजीता जोशीसोबत झाला होता. लग्नानंतर रंजीता पारंपरिक पद्धतीने माहेरी गेली होती. 20 दिवसांनंतर, अंकित तिला पहिल्यांदाच सासरहून घरी घेऊन येत होता.अंकित आपल्या पत्नीसोबत बाईकवरून घरी परतत असताना, वैभव पेट्रोल पंपाजवळ तीन अज्ञात तरुणांनी त्याची बाईक अडवली आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका अचानक होता की, अंकितला सावरण्याची संधीही मिळाली नाही.
advertisement
पत्नीने प्रियकराच्या खांद्यावर हात ठेवला
सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे मारामारी सुरू असताना, अंकितची पत्नी रणजिता बाईकवरून उतरली आणि हल्लेखोरांपैकी एकाच्या बाईकवर बसून पळून गेली. अंकितने सांगितले की, त्याच्या पत्नीने त्या तरुणाच्या खांद्यावर हात ठेवला आणि एकदाही मागे न बघता निघून गेली.
पीडिताने पोलिसांत तक्रार दाखल केली
दुसऱ्याच दिवशी, 21 जून रोजी, पीडित अंकितने तोरवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध आयपीसीच्या कलम 294, 323, 506 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बिलासपूरचे एएसपी राजेंद्र जयस्वाल यांनी सांगितले की, अंकित माहिलांगेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मारहाण झाल्याची पुष्टी झाली आहे आणि फरार तरुणांची ओळख पटवून पुढील कारवाई केली जात आहे.
हे ही वाचा : पत्नीला तिहेरी तलाक दिला, नंतर दीड वर्षांच्या मुलीला संपवलं; पतीचं क्रूर कृत्य पाहून पोलिसांनाही बसला धक्का!