advertisement

पत्नीला तिहेरी तलाक दिला, नंतर दीड वर्षांच्या मुलीला संपवलं; पतीचं क्रूर कृत्य पाहून पोलिसांनाही बसला धक्का!

Last Updated:

नाझमीन या महिलेने तिच्या पतीवर गंभीर आरोप करत न्यायासाठी SP कार्यालय गाठले. तिचा पती अरबाज, व्यवसायाने ड्रायव्हर, याने हुंड्याच्या मागणीसाठी तिला मारहाण केली, ट्रिपल तलाक दिला आणि... 

Triple Talaq case
Triple Talaq case
बायकोच्या मागे सतत हुंड्यासाठी तगादा लावला. पण ती मागणी पूर्ण न केल्यामुळे नवऱ्याने तिहेरी तलाक दिला. इतंकच करून तो हैवान शांत बसला नाही, तर दीड वर्षांच्या मुलीचाही त्याने जीव घेतला. ही धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील खरगोन शहरात घडली. भीकनगाव येथील पीडित महिला आपल्या आईसोबत पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचली. यावेळी पीडितेने रडत रडत एएसपी शकुंतला रुहल यांची भेट घेतली आणि न्यायाची मागणी केली.
सविस्तर प्रकरण असं की...
पीडितेचा आरोप आहे की, तिचा पती अरबाज, जो व्यवसायाने चालक आहे, त्याने तिला तिहेरी तलाक दिला. त्याने तिच्या दीड वर्षांच्या निष्पाप मुलीचाही जीव घेतला. हुंड्याच्या मागणीसाठी अरबाजने तिला तिहेरी तलाक दिला. इतकंच नाही तर त्याने दुसऱ्या महिलेशी लग्नही केलं आहे. तो तिला मारहाण करतो आणि धमक्याही देतो, असंही पीडितेने सांगितलं. पीडितेने माहिती दिली की, तिचं लग्न 5 वर्षांपूर्वी अरबाजसोबत झालं होतं. काही काळानंतर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली, पण अरबाजने हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे तिला तलाक दिला.
advertisement
पोलीस अधिकारी काय म्हणतात?
या प्रकरणी एएसपी शकुंतला रुहल यांनी कसरावद टीआयला तपास करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एएसपी म्हणाल्या की, भीकनगावची रहिवासी असलेली पीडित नाझमीन तिच्या आईसोबत आली होती. तिचं लग्न कसरावद पोलीस स्टेशनच्या अमलाथा गावातील अरबाजसोबत झालं होतं. पीडितेचं म्हणणं आहे की, तिच्या पतीने तिला तिहेरी तलाक दिला आहे. तो हुंड्याची मागणी करायचा. त्याने तिच्या दीड वर्षांच्या मुलीलाही मारून टाकलं. कसरावद टीआयला तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
पत्नीला तिहेरी तलाक दिला, नंतर दीड वर्षांच्या मुलीला संपवलं; पतीचं क्रूर कृत्य पाहून पोलिसांनाही बसला धक्का!
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement