सुनंदा शिवाजी वाघमोडे (वय 27) पतीपासून विभक्त राहात होती. तिचे शुभम बागूल याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र शुभमच्या दारू पिण्याच्या सवयी आणि त्रासाला कंटाळून सुनंदा आपल्या दोन मुलांसह हडको एन-12 भागात वेगळी राहत होती. तरीही शुभम तिच्यावर सोबत राहण्याचा दबाव टाकत होता आणि वारंवार तिचा पाठलाग करत असल्याचे तपासात समोर आले.
advertisement
'फक्त पैसे मागणारे आम्ही नाही' ट्रान्सजेंडर मनस्वीने तो डाग पुसला, काम पाहून तुम्ही कराल कौतुक
6 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता शुभम थेट सुनंदाच्या घरी पोहोचला. पुन्हा एकदा त्याने सोबत राहण्याचा आग्रह धरला. सुनंदाने स्पष्ट शब्दांत नकार दिल्याने तो चिडला. त्यानंतर त्याने कटरने तिचा गळा कापत तिची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी शुभमला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकिलांनी एकूण 15 साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी तीन महिला साक्षीदार न्यायालयात फितूर झाल्या, मात्र वैद्यकीय आणि तांत्रिक पुरावे अत्यंत निर्णायक ठरले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीनुसार सुनंदाच्या गळ्यावर 27 सेंटीमीटर लांबीची गंभीर जखम होती. कटरचे अर्धे ब्लेड तिच्या गळ्यात अडकलेले आढळून आले. यासोबतच आरोपी शुभमच्या हातांचे ठसे मिळाल्याने त्याचा गुन्हा सिद्ध झाला.सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने शुभम बागूल याला जन्मठेपेची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.






