सोबत राहण्यास नकार, प्रेयसी सोबत केलं नको ते कांड, प्रियकराच्या कृत्याने पोलीसही चक्रावले
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
सोबत राहण्यास नकार मिळाल्यानंतर संतापाच्या भरात कटरने गळा कापून 27 वर्षीय तरुणीची हत्या करणाऱ्या प्रियकरावर अखेर कायद्याचा कठोर प्रहार झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : सोबत राहण्यास नकार मिळाल्यानंतर संतापाच्या भरात कटरने गळा कापून 27 वर्षीय तरुणीची हत्या करणाऱ्या प्रियकरावर अखेर कायद्याचा कठोर प्रहार झाला आहे. शुभम भाऊसाहेब बागूल (वय 28, रा. सिद्धार्थनगर, हडको) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 20 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. हा निकाल गुरुवारी (22 जानेवारी) जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. खेडेकर यांनी दिला.
सुनंदा शिवाजी वाघमोडे (वय 27) पतीपासून विभक्त राहात होती. तिचे शुभम बागूल याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र शुभमच्या दारू पिण्याच्या सवयी आणि त्रासाला कंटाळून सुनंदा आपल्या दोन मुलांसह हडको एन-12 भागात वेगळी राहत होती. तरीही शुभम तिच्यावर सोबत राहण्याचा दबाव टाकत होता आणि वारंवार तिचा पाठलाग करत असल्याचे तपासात समोर आले.
advertisement
6 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता शुभम थेट सुनंदाच्या घरी पोहोचला. पुन्हा एकदा त्याने सोबत राहण्याचा आग्रह धरला. सुनंदाने स्पष्ट शब्दांत नकार दिल्याने तो चिडला. त्यानंतर त्याने कटरने तिचा गळा कापत तिची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी शुभमला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकिलांनी एकूण 15 साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी तीन महिला साक्षीदार न्यायालयात फितूर झाल्या, मात्र वैद्यकीय आणि तांत्रिक पुरावे अत्यंत निर्णायक ठरले.
advertisement
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीनुसार सुनंदाच्या गळ्यावर 27 सेंटीमीटर लांबीची गंभीर जखम होती. कटरचे अर्धे ब्लेड तिच्या गळ्यात अडकलेले आढळून आले. यासोबतच आरोपी शुभमच्या हातांचे ठसे मिळाल्याने त्याचा गुन्हा सिद्ध झाला.सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने शुभम बागूल याला जन्मठेपेची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 8:35 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
सोबत राहण्यास नकार, प्रेयसी सोबत केलं नको ते कांड, प्रियकराच्या कृत्याने पोलीसही चक्रावले








