Chhatrapati Sambhaji Nagar: दारूसाठी पैसे नाकारल्याने तरुणाला पोलिसांनी काठी तुटेपर्यंत फोडलं! छत्रपती संभाजीनगर हादरलं!

Last Updated:

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमधून खाकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुकुंदवाडी परिसरात दोन पोलिसांनी एका तरुणाला काठी तुटेपर्यंत बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या अमानुष कृत्यामुळे शहरात संताप व्यक्त केला जात आहे.

दारूसाठी पैसे नाकारल्याने तरुणाला पोलिसांनी काठी तुटेपर्यंत फोडलं!  छत्रपती संभाजीनगर हादरलं!
दारूसाठी पैसे नाकारल्याने तरुणाला पोलिसांनी काठी तुटेपर्यंत फोडलं! छत्रपती संभाजीनगर हादरलं!
अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: शहरातील मुकुंदवाडी भागात पोलिसांच्या दादागिरीचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अक्षय ठोकळ या तरुणाला दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी २१ जानेवारीच्या रात्री इतकी अमानुष मारहाण केली की, मारहाण करताना पोलिसांची काठीदेखील तुटली. या घटनेनंतर पोलिसांनी अक्षयला गंभीर अवस्थेत रस्त्यावर सोडून पळ काढल्याचा आरोप होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

अक्षय ठोकळ हा तरुण लाईट फिटिंगचे काम संपवून रात्री घरी परतत होता. अक्षयने लावलेल्या आरोपांनुसार, मुकुंदवाडी भागात दोन पोलिसांनी त्याला अडवले आणि दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. अक्षयने पैसे देण्यास नकार दिल्यावर, पोलिसांनी त्याची गाडी चोरीची असल्याचे म्हणत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण इतकी भीषण होती की पोलिसांच्या हातातील लाठीचे तुकडे झाले.
advertisement

खाकी वर्दीतील गुंडगिरी, नागरिकांमध्ये संतापाची लाट

या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारावर संतापाची लाट उसळली असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही शंका उपस्थित केली जात आहे. पोलिसांनी अक्षयला मारहाण करताना चोरीच्या गाडीचा आरोप केला होता. मात्र, गाडी चोरीची होती तर गुन्हा का नाही? जर पोलिसांना गाडी चोरीची असल्याचा संशय होता, तर रीतसर गुन्हा दाखल का केला नाही? असा सवालही उपस्थित होत आहे. अमानुष मारहाणीचा अधिकार कोणी दिला? कोणत्याही आरोपीला किंवा संशयिताला अशा प्रकारे काठी तुटेपर्यंत मारण्याचा अधिकार कायद्याने पोलिसांना दिलेला नाही.
advertisement

रुग्णालयाची भूमिका संशयास्पद:

तरुणाच्या मारहाण प्रकरणात रुग्णालयाची भूमिका देखील संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जखमी तरुणाची 'MLC' (मेडिको लीगल केस) घेण्यास रुग्णालय टाळाटाळ का करत आहे? कोणाच्या दबावाखाली ही प्रक्रिया थांबली आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

CCTV मध्ये काय दिसले?

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांची गाडी दिसत आहे, मग अक्षयला पोलीस ठाण्यात का नेले नाही? त्याला आणि त्याची गाडी रस्त्यावरच सोडून पोलीस का निघून गेले? असा सवालही उपस्थित होत आहे.
advertisement

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

सामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी असलेली पोलीस यंत्रणाच जर अशा प्रकारे भक्षक बनत असेल, तर दाद कोणाकडे मागायची? असा सवाल अक्षयच्या कुटुंबीयांनी विचारला आहे. आता या मारहाण करणाऱ्या दोषी पोलिसांवर पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार? त्यांना निलंबित केले जाणार का? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chhatrapati Sambhaji Nagar: दारूसाठी पैसे नाकारल्याने तरुणाला पोलिसांनी काठी तुटेपर्यंत फोडलं! छत्रपती संभाजीनगर हादरलं!
Next Article
advertisement
Raj Thackeray : बाळासाहेबांची शपथ घेत राज ठाकरेंनी दिला मोठा शब्द, मुंबईत होणार राजकीय भूकंप?
बाळासाहेबांची शपथ घेत राज ठाकरेंनी दिला मोठा शब्द, मुंबईत होणार राजकीय भूकंप?
  • महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय समीकरणांची उलथापालथ सुरू आहे.

  • मनसे मुंबईत उद्धव यांची साथ सोडून थेट महायुतीला पाठिंबा देतील अशी चर्चा

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे.

View All
advertisement