हत्येचं कारण ऐकून आणखी धक्का बसेल..
या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती अशी की, 10 तारखेला डीसा तालुक्यातील जावळ गावात गणेशभाई जेठाभाई पटेल नावाचे शेतकरी शेतात झोपले होते. त्याच वेळी त्यांची चुलत बहीण मंजू पटेल, तिचा प्रियकर सहदेव पटेल आणि दुसरा व्यक्ती भरत पटेल यांनी मिळून हत्येचा कट रचला आणि ते तिथे आले. या तिन्ही आरोपींनी धारदार शस्त्रांनी वार करून शेतकरी गणेश जेठालाल पटेल यांची हत्या केली. या खुनामागील कारण जर तुम्हाला कळलं, तर तुम्हाला आणखीनच धक्का बसेल. चुलत बहिणीने आपल्या भावाला मारलं, कारण त्याचं लग्न 'सट्टा' (साटं-लोटं) पद्धतीने झालं होतं.
advertisement
तिघांनी मिळून प्लॅन रचला आणि कांड केला
चुलत बहीण मंजूचं सहदेवसोबत प्रेमसंबंध होते आणि तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. या खुनाचा कट रचण्यासाठी चुलत बहिणीने गणेशच्या रोजच्या दिनचर्येची माहिती दिली होती. त्यानुसार रात्री ते तिघे बाईकवरून शेतात गेले. गणेशभाई झोपलेले असताना त्यांनी कुऱ्हाडी आणि तलवारीने हल्ला करून त्यांची हत्या केली. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी चुलत बहीण आणि तिच्या प्रियकरासह एकूण 3 लोकांना अटक केली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. मात्र, या घटनेमुळे सध्या डीसासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : कलयुगी पुत्र! आईच्या चितेवर बसून मागितले दागिने, अंत्यसंस्कारात घातला गोंधळ. पहा VIDEO
हे ही वाचा : 'सर, मी जिवंत आहे...', मृत तरूण बोलला अन् पोलिसांची उडाली झोप! नेमकं प्रकरण काय?