'सर, मी जिवंत आहे...', मृत तरूण बोलला अन् पोलिसांची उडाली झोप! नेमकं प्रकरण काय?
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
लालबांध परिसरात तलावात एक तरुण बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. नागरिकांनी मृत समजून पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचले व मृतदेह उचलणार असतानाच...
मृत्यू झालेला तरुण अचानक जिवंत झाला! होय... होय, रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमधील बोलपूरची ही गोष्ट आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना? तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे कसं शक्य आहे? पण ही घटना अगदी खरी आहे. मात्र, यामागे एक वेगळीच कहाणी दडली आहे. इतर दिवसांप्रमाणेच शांतिनिकेतनमधील लालबंध भागातील लोक आपापल्या कामात व्यस्त होते. अचानक त्यांची नजर जवळच्या एका तलावावर गेली.
ती व्यक्ती पाण्यात पडली आणि...
गावकऱ्यांनी पाहिलं, एक व्यक्ती पाण्यात पडलेली होती. बराच वेळ झाली तरी ती काही हालचाल करत नव्हती. जवळ गेल्यावर गावकऱ्यांना वाटलं की, कदाचित त्याचा मृत्यू झाला असावा. तात्काळ गावकऱ्यांनी शांतिनिकेतन पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. शांतिनिकेतन पोलीस ठाण्याचे पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी पोहोचले.
मोठी घटना घडली असती...
पोलीस अधिकारी जेव्हा मृतदेह उचलण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा ते थांबले. कारण अचानक तो मृतदेह बोलला, 'सर, मी जिवंत आहे'! परिसरातील नागरिकही हे ऐकून चकित झाले. तो व्यक्ती नशेच्या अवस्थेत पाण्यात पडला होता. शांतिनिकेतन पोलिसांनी खरी बातमी कळल्यावर त्याला चांगलीच फटकारले. स्थानिक लोकांनी सांगितलं की, जर हा तरुण असाच पडून राहिला असता, तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. त्याचा जीवही जाऊ शकला असता.
advertisement
घटना चांगलीच व्हायरल झाली...
असो, स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने एक मोठी दुर्घटना टळली. दुसरीकडे, ही अनोखी घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. कारण शांतिनिकेतनमधील लालबंध सर्वांनाच परिचित आहे. आणि अशा घटनेमुळे त्या परिसरात एक वेगळंच खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.
हे ही वाचा : "हॅलो, तुमची आई जिवंत आहे", 24 वर्षांनंतर मुलाला कळलं अन् धावत निघाला बंगालपासून राजस्थानपर्यंत...
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 17, 2025 4:55 PM IST
मराठी बातम्या/Viral/
'सर, मी जिवंत आहे...', मृत तरूण बोलला अन् पोलिसांची उडाली झोप! नेमकं प्रकरण काय?