किरण घरबुडवे हा मूळचा बार्शी येथील आहे. सासऱ्याच्या जमिनीत हिस्सा घे म्हणून त्याने पत्नीला तगादा लावला होता. 23 नोव्हेंबर 2021 रोजी तो पत्नी आणि मुलांसह धामणगाव येथून दुचाकीवरून बार्शीकडे जात होता. तेव्हा त्यांच्याच जमिनीच्या हिश्शावरून वाद झाला. पत्नी सोनाली वडिलांची जमीन घेण्यास तयार नव्हती.
खोलीचा दरवाजा उघडताच पत्नी प्रियकरासोबत दिसली; पतीनं घेतला टोकाचा निर्णय, बीडमध्ये खळबळ
advertisement
रागाच्या भरात किरण घरबुडवे याने पत्नीवर लोखंडी कोयत्याने डोक्यावर आणि मानेवर वार करून तिला ठार केले. याप्रकरणी धामणगावचे पोलीस पाटील आणि मृत विवाहितेचे चुलत भाऊ अतुल दिलीप हेडांबे यांनी वैराग पोलिसांत आरोपी किरण घरबुडवे याच्या विरोधात धाव घेतली. त्याच्यावर कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
12 साक्षीदारांची साक्ष
तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक विनय रामचंद्र बहिर यांनी आरोपीस ताब्यात घेतले आणि सबळ पुरावा गोळा करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी आरोपीची मुलगी व इतर साक्षीदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच पोलिसांनी गोळा केलेले पुरावे न्यायालयासमोर मांडले.
दरम्यान, तपासण्यात आलेले साक्षीदार व पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानुसार बार्शी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.एस.मलकलपट्टी यांनी पत्नीचा खून केल्याप्रकरणी पती किरण घरबुडवे यास जन्मठेपेची शिक्षा आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा आणि दंड न भरल्यास सहा महिन्याचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.






