TRENDING:

जेलची हवा खाल्ली तरी धंदा सुरूच, कोणाकडून 50 लाख तर कोणाकडून 28 लाख घेतले; संदीप शाहचे कारनामे समोर

Last Updated:

संदीप शाह हा वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवून देतो, नीट परीक्षेत गुण वाढवून देतो असे आमिष देऊन विद्यार्थी आणि पालकांची लाखोंची लूट करायचा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर :  नीट परीक्षेतील गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक केलेल्या सोलापुरातील संदीप शाहचे आणखी काही प्रताप आता समोर आले आहेत. संदीप शाह सध्या सीबीआयच्या ताब्यात आहे. चौकशीतच त्याचे कारनामे समोर आले आहे.
News18
News18
advertisement

मूळचा सोलापूरचा असलेला संदीप शाह हा वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवून देतो, नीट परीक्षेत गुण वाढवून देतो असे आमिष देऊन विद्यार्थी आणि पालकांची लाखोंची लूट करायचा. सोलापुरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये आरोपी संदीप शाह विरोधात या आधी तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. 2016 साली एका वर्तमानपत्रात संदीप शाह याने एमबीबीएस प्रवेश अशा आशयाची जाहीरात दिली होती. ती जाहिरात पाहून संदीप शाह याला संपर्क करणाऱ्या व्यक्तीला एमबीबीएस मध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो असे सांगून तब्बल 50 लाख रुपये घेतले होते.

advertisement

संदीपचे सगळे कारनामे बाहेर

सोलापुरात दाखल असलेल्या या तीन प्रकरणात जामीनावर तुरुंगातून सुटलेल्या संदीप शाह याने हा फसवणुकीचा धंदा सुरूच ठेवला होता. काही दिवसांपूर्वी नीट 2025 च्या परीक्षेत गुण वाढवून देण्यासाठी 90 लाखांची मागणी करतं 87 लाख 50 हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी संदीप शाह याला CBI ने अटक केली आहे. संदीप शाह सोलापुरातील विजापूर रोड परिसरातील एका सोसायीटीमध्ये राहण्यास  होता, संदीप शहा यांनी अनेक जणांना फसवल्याची माहिती ही समोर आली आहे..

advertisement

फसवणूक झाल्याचे समोर

या सर्व प्रकरणात आरोपी संदीप शाह याने पैसे स्वीकारुन कोणालाही अॅडमिशन मिळवून दिले नाही. तीनही प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांनी आरोपी संदीप शाह विरोधात सोलापुरातील विजापूर नाका, फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

मराठी बातम्या/क्राइम/
जेलची हवा खाल्ली तरी धंदा सुरूच, कोणाकडून 50 लाख तर कोणाकडून 28 लाख घेतले; संदीप शाहचे कारनामे समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल