कौटुंबिक कलहाचा सामना करणाऱ्या डॉ.शिरीष वळसंगकर यांना 17 एप्रिल रोजी त्यांच्या रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी मनिषा यांनी दोन पानी ई-मेल केला.तोच ई-मेल डॉ.शिरीष यांची पत्नी डॉ.उमा, मुलगा डॉ.अश्विन आणि सून डॉ.शोनाली यांनाही पाठविला होता. त्याच दिवशी दुपारी पावणेपाच आणि सायंकाळी सव्वापाच या वेळेत 56 मिनिटे मनिषा यांनी डॉ.शिरीष यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती. 18 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आणि सव्वासातच्या सुमारास डॉ.शिरीष यांनी मुलगा डॉ. अश्विन यांना आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल भेटून आणि फोनवरून माहिती दिली होती. 'मनिषा मुसळे हिच्यामुळे होणारा त्रास मी विसरू शकत नाही, सहनही करू शकत नाही.त्यामुळे मी माझे जीवन संपविण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
रुग्णालयासमोर जाळून घेऊन आत्महत्या करण्याचीही धमकी
मनिषा हिची रुग्णालयातील अरेरावी आणि पैशांचा गैरव्यवहार समजल्यावर डॉ.शिरीष यांनी डिसेंबर 2024 पासून तिचे अधिकार कमी केले होते.त्यामुळे चिडलेल्या मनीषाने डॉ.शिरीष यांना भेटून आणि फोनवरून सतत बदनामी व प्रतिमा मलिन करण्याची धमकी दिली. ई-मेल पाठवून मुलांना मारून स्वत: रुग्णालयासमोर जाळून घेऊन आत्महत्या करण्याचीही धमकी दिली होती,असे पोलिसांनी त्यांच्या दोषारोपपत्रात म्हटले आहे.आता मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे त्या दोषारोपपत्राचा अभ्यास करून सुनावणीवेळी न्यायालयात बाजू मांडतील.न्यायालयाच्या सुनावणीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.तत्पूर्वी, मनीषाच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे.
आतापर्यंत काय काय झालं?
- तपासाचे एकूण दिवस - 58
- एकूण साक्षीदार - 73
- जप्त केलेल्या वस्तू - 19
- जप्त केलेली कागदपत्रे -108
- दोषारोपपत्र - 720 पाने