घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी मुलानं आपल्या आईचा गळा दाबून तिची हत्या केली आहे. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली आहे. शवविच्छेदन अहवालात कमलाबाई बडबाईक यांच्या गळ्यावर जखमा आढळून आल्यानं त्यांची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनाकडून देण्यात आली आहे.
advertisement
शुल्लक कारणातून हत्या
आरोपीला दारूचे व्यसन होते. तो दारू पिण्यासाठी सतत पैशांची मागणी करायचा. त्याने दारूचे व्यसन भागविण्यासाठी आईकडे मोबाईलची मागणी केली होती. मात्र आईने मोबाईल देण्यास नकार दिला. आईने मोबाईल देण्यास नकार दिल्यानं आरोपीने आईची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
Location :
Nagpur,Nagpur,Maharashtra
First Published :
Oct 21, 2023 8:37 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Nagpur News : धक्कादायक! मोबाईल दिला नाही म्हणून मुलानंच केली आईची हत्या, नागपूर हादरलं
