TRENDING:

Suchana Seth Case : 4 वर्षांच्या मुलाची हत्या प्रकरणी सर्वात मोठा खुलासा, 10 धक्कादायक बाबी समोर

Last Updated:

पोलिसांनी तिला फिश करी ऑफर केली, तेव्हा ती आरामात खाऊ लागली. या प्रकरणातल्या 10 धक्कादायक बाबी जाणून घेऊ या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बंगळुरू : आपल्या चार वर्षांच्या मुलाची कथितरीत्या हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या बेंगळुरूतल्या सूचना सेठ नावाच्या सीईओच्या कृत्यामुळे सगळ्या देशाला धक्का बसला आहे. एका आईने आपल्याच मुलाला इतक्या क्रूरपणे कसं ठार केलं, यावर सहजासहजी विश्वासच बसत नाहीये. सूचना सेठने पतीशी असलेल्या वादामुळेच आपल्या मुलाची हत्या केली. सध्या ती सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत असून, पोलीस तपास सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास जसजसा करत आहेत, तसतशा अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. सूचना सेठला सोमवारी (8 जानेवारी) रात्री कर्नाटकातल्या चित्रदुर्गमधून अटक करण्यात आली होती. तिला मंगळवारी गोव्यात आणण्यात आलं.
News18
News18
advertisement

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूचना सेठला आपल्या मुलाची हत्या केल्याचा कोणताही पश्चात्ताप होत नाही. एवढंच नाही, तर पोलीस कोठडीत आरामात फिश करी खात आहे. पोलिसांनी तिला फिश करी ऑफर केली, तेव्हा ती आरामात खाऊ लागली. या प्रकरणातल्या 10 धक्कादायक बाबी जाणून घेऊ या.

1. सूचना सेठने 6 जानेवारी रोजी गोव्यात कँडोलिममध्ये एका अपार्टमेंटमध्ये चेक-इन केलं आणि 8 जानेवारीपर्यंत तिथे राहिली. तिने त्या अपार्टमेंटमध्ये आपल्या 4 वर्षांच्या मुलाची हत्या केली, असा आरोप आहे. तिने मुलाचा मृतदेह बॅगेत भरला आणि आठ जानेवारीला एका टॅक्सीतून कर्नाटकात घेऊन जायला निघाली.

advertisement

2. मुलाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून उघड झालं, की मुलाची हत्या कापड किंवा उशी तोंडावर दाबून करण्यात आली होती. तिच्या खोलीत खोकल्यावरचं सिरपही पोलिसांना सापडलं आहे.

3. कॅब ड्रायव्हरच्या मदतीने सूचना सेठला कर्नाटक राज्यातून अटक करण्यात आली. ड्रायव्हरने सांगितलं, की 10 तासांहून सुरू असलेल्या संपूर्ण प्रवासात सूचना सेठ शांतच होती.

4. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सूचना सेठ तपासात सहकार्य करत नाहीये आणि तिला आतापर्यंत आपल्या मुलाचा मृत्यू आणि त्यासाठी आपण कारणीभूत असणं या कशाचाच पश्चात्ताप झालेला दिसत नाहीये. 39 वर्षीय सूचना सेठ हिचा तिचे पती व्यंकटरमण यांच्याशी मुलाच्या ताब्यावरून कायदेशीर वाद सुरू होता.

advertisement

5. सूचना सेठच्या बॅगेत एक हस्तलिखित नोंद सापडली आहे. आपल्या पतीशी असलेलं भांडण आणि सुरू असलेली कायदेशीर कार्यवाही यांमुळे येत असलेल्या मानसिक थकव्याबद्दल लिहिलं आहे. ही नोंद आयलायनरच्या साह्याने टिश्यू पेपरवर लिहिण्यात आली होती, असं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे.

6. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, की त्या नोंदीबद्दल अधिक माहिती उघड करू शकत नाही; मात्र ती आपल्या मुलाच्या ताब्याच्या विषयावरून त्रस्त होती, हे यावरून दिसून येतं.

advertisement

7. तपासात पोलिसांना असं समजलं, की तिने आपल्यापासून वेगळं राहत असलेल्या पतीला 6 जानेवारीला असा मेसेज पाठवला होता, की दुसऱ्या दिवशी ते मुलाला भेटू शकतात; मात्र ते घरी आले, तेव्हा बेंगळुरूतल्या घरी कोणीच नव्हतं.

8. सूचना सेठ आणि तिच्या पतीच्या घटस्फोटाच्या कागदपत्रांमधल्या माहितीनुसार, सूचना सेठने 2022मध्ये पती व्यंकटरमण यांच्या विरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. आपलं आणि आपल्या मुलाचं शारीरिक शोषण पती करत असल्याचा आरोप तिने त्यात केला होता. व्यंकटरमण यांनी कोर्टात या आरोपाचा इन्कार केला आहे.

advertisement

9. सूचना सेठ आणि व्यंकटरमण यांची भेट बेंगळुरूत झाली होती. त्यांचं लग्न 2010मध्ये झालं होतं. त्यांच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रत्येक रविवारी आपल्या मुलाला भेटण्याची परवानगी पतीला देण्याच्या कोर्टाच्या आदेशावर ती नाखूश होती, असं सूत्रांचं म्हणणं आहे. व्यंकटरमण यांचं मासिक उत्पन्न 9 लाख रुपये असल्याचा हवाला देऊन तिने दरमहा 2.5 लाख रुपये उदरनिर्वाह भत्ता/पोटगी मागितली होती, असं न्यायालयीन कागदपत्रांवरून दिसून येतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krushi Market: मक्याचे दर भुईसपाट! कांदा, सोयाबिनला रविवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

10. सूचना सेठने आपली मित्रमंडळी आणि कुटुंबीयांना सांगितलं होतं, की मुलगा पतीसारखा दिसतो आणि पतीशी वितुष्ट आलेल्या नात्याची त्याच्यामुळे कायम आठवण येत असे. या कारणामुळे तिने आपल्या मुलाची हत्या केली.

मराठी बातम्या/क्राइम/
Suchana Seth Case : 4 वर्षांच्या मुलाची हत्या प्रकरणी सर्वात मोठा खुलासा, 10 धक्कादायक बाबी समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल