TRENDING:

Thane Crime News: कामाच्या बहाण्याने इमारतीत नेलं, अन् शांतीसोबत घडलं भयंकर, स्थानिकही हादरले

Last Updated:

Thane Crime : कळवा परिसरातील ‘सीमा हाईट्स’ इमारतीत शनिवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. कामाच्या बहाण्याने 40 वर्षीय शांती चव्हाण या महिलेला इमारतीत नेले. मात्र, त्यांच्यासोबत भयंकर घडलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: कळवा परिसरातील ‘सीमा हाईट्स’ इमारतीत शनिवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. कामाच्या बहाण्याने 40 वर्षीय शांती चव्हाण या महिलेला इमारतीत नेले. मात्र, त्यांच्यासोबत भयंकर घडलं. इमारतीमधील प्रवास हा तिच्यासाठी अखेरचा ठरला. शांती चव्हाण यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. शनिवारी सकाळी ही घटना घडली.
News18
News18
advertisement

शांती चव्हाण या नाका कामगार होत्या आणि रोजंदारीवर इमारतींवर बिगारी काम करत असत. त्या सम्राट अशोकनगर झोपडपट्टीत राहत होत्या. १५ जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास त्या कळवा नाक्यावर बिगारी कामासाठी आल्या होत्या. काही वेळातच काही नागरिकांनी त्यांना 'सीमा हाईट्स' या इमारतीत सफाई कामाच्या बहाण्याने बोलावले. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृतदेह इमारतीत सापडला.

advertisement

अन् सगळेच हादरले...

दुपारी इतर एक कामगार शिडी आणण्यासाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर ही हत्या उघडकीस आली. त्या वेळी शांती चव्हाण यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. सकाळी 9.30 ते 10 च्या दरम्यान हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे. शांती यांचा मृतदेह आढळल्याने कामगारांसह, काही स्थानिकही हादरले.  शांती एका कानातील कुडीही गायब असल्याचे आढळले आहे.

advertisement

लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न की लुटमार?

या हत्येचं नेमकं कारण काय, याचा शोध घेण्यासाठी पोलीस सर्व शक्यता तपासत आहेत. ही हत्या लुटमारीसाठी करण्यात आली का? की तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आणि तिने प्रतिकार केल्यामुळेच तिचा जीव घेतला गेला? या दोन्ही शक्यतांचा तपास सुरू आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krishi Market: कांद्यानं रडवलं, रविवारी मका अन् सोयाबीनला किती मिळाला भाव?
सर्व पहा

कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक उतेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी साक्षीपुरावे संकलित करण्यात आले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणाचा तपास कळवा पोलीस करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
Thane Crime News: कामाच्या बहाण्याने इमारतीत नेलं, अन् शांतीसोबत घडलं भयंकर, स्थानिकही हादरले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल