रक्षाबंधनाला लक्षात आली चोरी
आरोग्य विभागातून नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या 58 वर्षीय महिला आपला मुलगा आणि मुलीसह हडको परिसरात राहतात. 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण असल्याने त्यांच्या मुलाने सोन्याची अंगठी मागितली. जेव्हा त्यांनी कपाट उघडले, तेव्हा त्यांना डब्यात एकही दागिना दिसला नाही. सोबतच 1 लाख 55 हजार रुपये रोख रक्कमही गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुमारे 14.1 तोळे दागिने आणि 1 लाख 55 हजार रुपये चोरीला गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला.
advertisement
सोनं चोरल्याचे मुलीने केलं कबूल
त्यांनी याबद्दल मुलाला विचारले असता, त्याला काहीच माहिती नसल्याचे त्याने सांगितले. पण अकरावीत शिकणारी मुलगी मात्र उत्तर देताना गडबडली. आईने तिला विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने आपला मित्र मंगेश याला हे सर्व दागिने आणि पैसे दिल्याची कबुली दिली. मंगेशने दागिने नसल्याचे सांगितल्याने हतबल झालेल्या आईने अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली.
मित्राने सांगितले, 'पैसे खाण्यापिण्यावर उडवले'
तक्रार मिळताच पोलीस निरीक्षक मंगेश जगताप आणि उपनिरीक्षक सचिन देशमुख यांनी तात्काळ कारवाई करत मंगेशला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मंगेशने गुन्हा कबूल केला. त्याने मैत्रिणीला भावनिक करून तिच्याकडून दागिने आणि पैसे घेतल्याचे सांगितले. पण हे सर्व दागिने विकून आलेले पैसे खाण्यापिण्यावर उडवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, मंगेशला अटक केली आहे. त्याने दागिने कुठे विकले आणि पैशांचे काय केले, याचा पुढील तपास सुरू असल्याचे निरीक्षक जगताप यांनी सांगितले.
हे ही वाचा : 'तो' मागून आला, हिसकावलं मंगळसूत्र, पळून जाणार इतक्यात असं काही घडलं की... साताऱ्यात घडला थरार!
हे ही वाचा : कोल्हापुरात चोरट्यांचं खतरनाक धाडस! भरदुपारी-भरवस्तीत फोडलं घर, चोरी 'इतकी' मोठी की, पोलिसांचीही उडाली झोप!