'तो' मागून आला, हिसकावलं मंगळसूत्र, पळून जाणार इतक्यात असं काही घडलं की... साताऱ्यात घडला थरार!

Last Updated:

साताऱ्यातील शाहू कला मंदिर परिसरातून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 2 लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळून जाणाऱ्या चोरट्याला...

Satara Crime
Satara Crime
सातारा : शहरातील शाहू कला मंदिर परिसरातून पायी जात असलेल्या दोन महिलांपैकी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळून जाणाऱ्या एका चोरट्याला नागरिकांनी थरारक पाठलाग करून पकडले. विशेष म्हणजे, ज्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला, त्यांनी जोरदार प्रतिकार करत आरडाओरडा केल्यामुळे हा चोरटा सापडला. संतप्त नागरिकांनी या चोरट्याला चांगलाच चोप दिला.
प्रसन्न भरत चव्हाण (रा. भरतगाव, ता. सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या घटनेची तक्रार उदय वासुदेव आपटे (वय 67, रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.
महिलांचा प्रतिकार आणि नागरिकांची मदत
ही घटना 10 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. तक्रारदार उदय आपटे यांच्या पत्नी उर्मिला आणि बहीण माधुरी या दोघी शाहू कला मंदिराच्या परिसरातून पायी जात होत्या. त्यांच्या मागून आलेल्या संशयित तरुणाने अचानक माधुरी यांच्या गळ्यातील सुमारे 2 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. अचानक घडलेल्या या घटनेने महिला सुरुवातीला घाबरल्या, पण त्यांनी लगेच प्रतिकार करत मदतीसाठी आरडाओरडा केला.
advertisement
2 नागरिकांनी चोरट्याला पकडले आणि...
महिलांचा आवाज ऐकून दिलीप जाधव (रा. बोडारवाडी, ता. सातारा) आणि असिफ भालदार (रा. भवानी पेठ, सातारा) या दोघांनी तात्काळ चोरट्याचा पाठलाग सुरू केला. चोरटा गर्दीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण या दोघांनी आणि इतर नागरिकांनी त्याला घेरले. नागरिकांनी त्याला पळू दिले नाही आणि जागीच पकडले. संतप्त जमावाने त्याला चांगलाच चोप दिला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चोरट्याकडून चोरलेले मंगळसूत्र जप्त केले आणि त्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात नेले.
मराठी बातम्या/क्राइम/
'तो' मागून आला, हिसकावलं मंगळसूत्र, पळून जाणार इतक्यात असं काही घडलं की... साताऱ्यात घडला थरार!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement