'माझ्याशी बोल, नाहीतर...', नराधमाने धमकी दिली, नंतर गोठ्यात नेलं अन् विवाहितेसोबत भयानक कृत्य केलं! 

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील एका गावात पती घरी नसताना 33 वर्षीय विवाहितेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी...

Crime News
Crime News
छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील एका गावात पती घरी नसताना एका 33 वर्षीय विवाहितेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 जुलै रोजी रात्री 10 वाजता घडलेल्या या प्रकरणात पीडितेने 11 ऑगस्ट रोजी पतीसोबत अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
"माझ्याशी बोलत जा, नाहीतर..."
आरोपी रमेश शामराव जाधव (वय-36) हा पीडितेच्या ओळखीचा आहे. पीडितेचा पती घरी नसताना तो तिच्याकडे वारंवार येत असे. 'तू मला आवडतेस, माझ्याशी बोलत जा, नाहीतर मी तुझ्या पतीला मारून टाकीन,' अशी धमकी तो तिला देत होता. त्याने पीडितेला एक मोबाईलही भेट दिला आणि सतत फोनवर बोलण्यासाठी दबाव टाकत होता.
advertisement
शेळ्यांच्या गोठ्यात केला अत्याचार
25 जुलैच्या रात्री, पीडितेचा पती घरी नसताना, आरोपी रमेश जाधव मुलांना भेटण्याच्या बहाण्याने तिच्या घरी आला. त्यानंतर त्याने तिला घराशेजारील शेळ्यांच्या गोठ्यात बोलावले आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेने अजिंठा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी रमेश जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार धम्मदीप काकडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
'माझ्याशी बोल, नाहीतर...', नराधमाने धमकी दिली, नंतर गोठ्यात नेलं अन् विवाहितेसोबत भयानक कृत्य केलं! 
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement