असा रचला कट
कोल्हापुरातील एका कुरिअर कंपनीत वर्षभरापूर्वी काम करणाऱ्या एका तरुणाने नोकरी सोडली होती. त्याला काही काम मिळत नव्हते. दरम्यान, त्याची ओळख हातकणंगले तालुक्यातील एका तरुणासोबत झाली. भेटीत त्याने कुरिअर गाडीतून मोठ्या प्रमाणात रोकड जात असल्याचे सांगितले. पण हे काम आपल्या दोघांचे नाही, आणखी लोक लागतील, अशी चर्चा दोघांमध्ये झाली. यानंतर सर्फराज नदाफने आपल्या ओळखीच्या तरुणांना एकत्र केले. ‘आपण रातोरात करोडपती होऊ’, अशी स्वप्ने दाखवून त्याने दरोड्याचा प्लॅन आखला.
advertisement
अपेक्षित रोकडऐवजी सोने-चांदी
संपूर्ण दरोड्याची भिस्त माजी कर्मचाऱ्यावर होती. त्याने टीप दिल्यानंतरच दरोड्याचा प्लॅन अंमलात आणला जाणार होता. ठरल्याप्रमाणे, रविवारी मध्यरात्री कोल्हापुरातून कुरिअरची रोकड गाडी पुण्याच्या दिशेने निघाली. ती गाडी निघाल्याची टीप मिळताच, पाचजण कारमधून तर दोघे दुचाकीवरुन कुरिअर गाडीचा पाठलाग करत काशीळजवळ आले. त्यांनी गाडी पळवली आणि वाटेत रोकड असलेली बॅग घेऊन गाडी सोडून दिली. धावत्या गाडीतच बॅग उघडून पाहिले, तेव्हा अंदाजे 11 लाखांचे सोने आणि चांदी दिसली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे रोकड हाती न लागल्याने त्यांचा मोठा हिरमोड झाला.
असा झाला खुलासा
कुरिअरची गाडी लुटल्यानंतर सातारा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि कुरिअर मालकाने गाडीच्या चालकाचे काढलेले फोटो यामुळे पोलिसांचा संशय कुरिअरच्या माजी कर्मचाऱ्यावर बळावला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला आणि 'गाडीत खूप पैसे असतात, ते लुटल्यावर आम्ही सगळे रातोरात श्रीमंत होणार होतो', असे सांगितले. मात्र, श्रीमंत होण्याऐवजी आता त्यांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
हे ही वाचा : मर्सिडीज कारमधून येत होता उग्र वास, डिग्गी उघडताच आतमध्ये आढळला प्रसिद्ध बिल्डरचा सडलेला मृतदेह, काय घडलं?
हे ही वाचा : शक्तीपीठ महामार्गाचं काम थंड का? 'त्या' राजकीय धड्यानंतर आता 'या' निवडणुकांचा फटका बसण्याची नेत्यांना भीती!