शक्तीपीठ महामार्गाचं काम थंड का? 'त्या' राजकीय धड्यानंतर आता 'या' निवडणुकांचा फटका बसण्याची नेत्यांना भीती!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता देऊन दोन आठवडे उलटले, तरी अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. या महामार्गाला...
Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता देऊन दोन आठवडे उलटले, तरी अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. या महामार्गाला बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून प्रशासनाने सध्या या प्रकल्पाला 'विश्रांती' दिली असल्याची चर्चा आहे. निवडणुका झाल्यावरच या प्रकल्पाच्या कामाला वेग येईल, असे संकेत मिळत आहेत.
शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंत 802 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग नियोजित आहे. यासाठी 28 ऑगस्ट 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने 20,787 कोटी रुपयांच्या निधीसह भूसंपादनास प्रशासकीय मान्यता दिली आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यात संयुक्त मोजणीला तीव्र विरोध झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश काढले आहेत. लोकसभा निवडणुकीत या विरोधाचा फटका महायुतीला बसल्याचे दिसून आले होते. आता पुन्हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मतदार असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जवळ आल्याने, पोलीस बळाचा वापर करून जमीन संपादन केल्यास राजकीय फटका बसू शकतो, अशी भीती स्थानिक नेत्यांमध्ये आहे.
advertisement
कोल्हापुरातही पर्यायाचा शोध नाही
या प्रकल्पातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा या तालुक्यांतून जाणाऱ्या महामार्गासाठी पर्यायी मार्गाचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अद्याप सत्ताधाऱ्यांकडून या दिशेने कोणतीही हालचाल झालेली दिसत नाही.
समितीचा तीव्र विरोध
या महामार्गाला विरोध करणाऱ्या समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला धडा शिकवला आहे. तरीही सरकार गरज नसताना हा महामार्ग रेटत आहे. आता पुन्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत बाधित शेतकरी महायुतीला धडा शिकवतील," असे मत त्यांनी मांडले.
advertisement
हे ही वाचा : एसटीचं चाक जास्त फिरणार! दिवाळीत प्रवाशांना होणार नाही कसलाच त्रास, महामंडळाने काढला 'हा' आदेश
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 9:41 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शक्तीपीठ महामार्गाचं काम थंड का? 'त्या' राजकीय धड्यानंतर आता 'या' निवडणुकांचा फटका बसण्याची नेत्यांना भीती!