कटिहार : अनेकजणांना लोकांपासून लपून प्रेम करणं म्हणजे फार रोमांचक वाटतं. परंतु जेव्हा लोकांसमोर त्यांचं प्रेम येतं, तेव्हा मात्र तो गुन्हा वाटू लागतो. अशीच एक घटना समोर आली. परंतु इथं परिस्थिती जरा वेगळी आहे. प्रेमाबाबत कळल्यामुळे लोकांनी त्रास दिला म्हणून नाही, तर लग्न लावून दिलं म्हणून प्रेम केलं ही चूक झाली असं प्रियकराला वाटतंय आणि म्हणूनच आता तो तुरुंगवास भोगतोय.
advertisement
बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातल्या मधुबनीची तरुणी आणि पूर्णियाच्या सरसी भागातील तरुण मागील 5 वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. लोकांच्या नजरेपासून लपूनछपून त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघांमध्ये सारंकाही आलबेल होतं. मात्र कटिहार कोढा बाजारातील एका हॉटेलमध्ये दोघांना तरुणीच्या नातेवाईकांनी नको त्या अवस्थेत पकडलं आणि थेट लग्नाच्या मंडपात उभं केलं.
Men And Women Health : महिलांनी जास्त भाज्या खाव्या की पुरुषांनी? उत्तर वाचून चक्रावून जाल!
सुरुवातीला नातेवाईक प्रचंड रागवले. कारण दोघांना एकत्र बघून त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर त्यांचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. जवळच्याच महादेव मंदिरात कुटुंबीय आणि गुरुजींच्या साक्षीने दोघांचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नामुळे तरुणीचा आनंद गगनात मावेनासा झाला. परंतु तरुण मात्र प्रचंड नाराज झाला.
Interesting Facts : कपाळावर दोन भुवयांच्या मध्येच टिकली का लावली जाते? वाचा आश्चर्यकारक कारण
तरुणाचं म्हणणं आहे की, त्याच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नसेल. शिवाय त्याने आपलं लग्न जबरदस्तीने लावल्याचा आरोप केला आहे. यातूनच त्याने तरुणीला आपल्या आयुष्यातून निघून जाण्यास सांगितलं. मग काय, तरुणीने त्याच्याविरोधात पोलिसांत धाव घेतली आणि त्याला थेट तुरुंगाचा रस्ता दाखवला. आता तरुण तुरुंगात आहे, तर दोघांची लव्हस्टोरी परिसरात भलतीच चर्चेत आलीये.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g