रोज होत होता पतीसोबत वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमलेशचा पती देवकी नंदन हा मजुरी करत होता आणि तो दारू पिऊन नेहमी पत्नीला मारहाण करत असे. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. 21 जूनच्या सायंकाळी देवकी नंदन दारू आणि चिकन घेऊन घरी आला. अर्धी बाटली दारू प्यायल्यानंतर तो बाहेर गेला, तेव्हा विमलेशने उरलेल्या दारूमध्ये झोपेच्या चार गोळ्या मिसळल्या. देवकी नंदन परत आल्यावर त्याने तीच गोळ्या मिसळलेली दारू प्यायली. यानंतर थोड्याच वेळात त्याची तब्येत बिघडली आणि त्याचा घरीच मृत्यू झाला. देवकी नंदनचा भाऊ गंगाराम याने या घटनेची माहिती पोलीस ठाण्यात दिली. त्याने वहिनी विमलेशवर हत्येचा आरोप केला.
advertisement
अटक आणि खुलासा
खाजोरिया पोलीस स्टेशनचे प्रभारी राजीव कुमार यांनी सांगितले की, महिलेला सकाळी तिच्या घरातून अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान विमलेशने आपला गुन्हा कबूल केला. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, बेडरूममधून अल्प्राझोलम नावाच्या झोपेच्या गोळ्याही जप्त करण्यात आल्या, ज्या तिने 10 दिवसांपूर्वी आपल्या पतीला मारण्यासाठी मागवून घेतल्या होत्या.0
पतीला झोपवण्यासाठी...
विमलेश हिने पोलिसांना सांगितले की, तिचा हेतू पतीला मारण्याचा नव्हता. तिला फक्त तिचा पती भांडू नये आणि लवकर झोपावे असे वाटत होते. त्यामुळे तिने दारूमध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या, पण त्याचा चुकून मृत्यू झाला. या घटनेनंतर विमलेशला न्यायालयात हजर केले, जिथे तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली. आता प्रश्न असा आहे की, अडीच वर्षांचा मुलगा हितेश कोणासोबत राहणार? लोक म्हणतात की, वडील गेल्याने आणि आई तुरुंगात गेल्याने मुलगा आता पोरका झाला आहे. सध्या हितेशची आजी मालदेई त्याची काळजी घेत आहे.
हे ही वाचा : पत्नीला तिहेरी तलाक दिला, नंतर दीड वर्षांच्या मुलीला संपवलं; पतीचं क्रूर कृत्य पाहून पोलिसांनाही बसला धक्का!