वसई तालुक्यातील नायगाव येथे अल्पवयीन मुलींची विक्री करणाऱ्या सेक्स रॅकेटचा मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने भंडाफोड केला आहे. या कारवाईत आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यात काही महिलांचाही समावेश आहे.
नशेचे इंजेक्शन, शरीरावर गरम चमच्याने चटके...
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी बांगलादेशातील गरीब मुलींना चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत कोलकात्यात आणत. त्यानंतर दलालांच्या माध्यमातून त्या मुलींना देशाच्या विविध भागांत पोहोचवून वेश्याव्यवसायास भाग पाडले जात असे. नकार दिल्यास पीडितांना गरम चमच्याने चटके देणे, अमानुष मारहाण, नशेचे इंजेक्शन देऊन लैंगिक अत्याचार करणे, तसेच त्या अत्याचारांचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्याचा अमानुष प्रकार राबवला जात होता.
advertisement
नायगावच्या ‘स्टार सिटी’ इमारतीत आरोपींनी आपले अड्डे स्थापन केले होते. मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी सापळा रचून संपूर्ण रॅकेट उध्वस्त केले.
भाडेकरूंची माहिती द्या, अन्यथा...
जर कोणी स्थानिक किंवा परदेशी व्यक्तीला खोली भाड्याने देत असेल, तर त्याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक आहे. अन्यथा माहिती लपवल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.