डॉक्टरांच्या पथकाकडून तुरुंगातच वाल्मीक कराडवर उपचार करण्यात येणार आहेत. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला रुग्णालयात हलवण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मीक कराडला कालपासून शुगर आणि कमी रक्तदाबाचा त्रास जाणवत आहे. सध्या वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. मात्र प्रकृतीत अधिक बिघाड झाल्यास त्याला रुग्णालयात दाखल केलं जाण्याची शक्यता आहे.
advertisement
वाल्मिकचा मुक्काम जेलमध्ये वाढला
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मोक्का कोर्टात सुनावणी घेतली जात आहे. ३ जून रोजी वाल्मीक कराडच्या डिस्चार्ज अॅप्लिकेशनवर युक्तीवाद झाला होता. वाल्मीक कराडच्या बाजुने निर्णय लागल्यास त्याची तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा होणार होता. मात्र आता त्याचा हा डाव तूर्तास फसला. वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज याचिकेवर कोर्टानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं होतं. यामुळे वाल्मीकचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. त्याला आणखी बराच काळ तुरुंगात राहावं लागू शकतं.
कराडच्या वकिलाने दाखल केलेल्या डिस्चार्ज अॅप्लिकेशनला सरकारी पक्षाचे वकील उज्वल निकम यांनी जोरदार विरोध केला होता. यावर दोन्ही बाजुने जोरदार युक्तिवाद झाला. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी पक्ष आणि आरोपींच्या वकिलाकडून कोर्टात इतरही काही अर्ज दाखल करण्यात आले होते. त्या सगळ्या अर्जांवर एकत्रित सुनावणी होणार आहे.