मिळालेल्या माहितीनुसार,वर्ध्यात पीव्हीआर मल्टी ट्रेडींगच्या नावाखाली जादा परताव्याचे आमिष देऊन नागरीकांकडून गुंतवणूक करून घेतली जात होती. या आमिषाला बळी पडलेल्या गुंतवणूकदारांची आता फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.पोलिसांच्या पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला ही घटना कळताच त्यांनी हा घोटाळा उघड केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य आरोपी विक्रम पर्वत आणि या फसवणूकीत साथ देणाऱ्या किरण पवार यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी 9 मोबाईल, लॅपटॉप, 22 एटीएम कार्ड, रोख व सोन्याच्या अंगठ्या तसेच आरोपीने स्वतः पैसे देऊन दुसऱ्याच्या नावाने खरेदी केलेल्या दोन कार असा एकूण 44 लाख 13 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच गुन्हयात बँकेतील रोख रक्क्म 8 लाख 71 हजार 116 रूपये जप्त करण्यात आले आहेत.त्याचसोबत आरोपींनी वर्धा येथील एका फायनान्स कंपनीत गहाण ठेवलेले 558.2 ग्रॅम व कोलकत्ता येथील एका फायनान्स कंपनीत गहाण ठेवलेले सुमारे 200 ग्रॅम सोने गोठविण्यात आले आहे.
advertisement
आता पोलिसांनी विक्रम पर्वत आणि किरण पवार या दोन्ही आरोपींची चौकशी सूरू केला आहे. या चौकशीतून आणखीण काय बाहेर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.