हल्ल्यापूर्वी नेमकं घडलं काय?
सविस्तर माहिती अशी की, संबंधित महिला तिच्या घरासमोर आपल्या मुलासोबत बोलत बसली होती. त्याचवेळी दारू पिऊन आलेला विनोद दारूच्या नशेत शिवीगाळ करू लागला. त्यामुळे महिलेच्या मुलाने त्याला हटकले असता विनोदने त्यांच्यासोबत भांडणं काढले आणि चाकूने हल्ला चढविला.
हल्ल्यात एकजण गंभीर जखमी
भांडणं पाहून महिलेचा पुतण्या संदीप मेश्राम धावून आला असता त्याच्यावरही वार केले. यात तो गंभीररित्या जखमी झालेला आहे. घटना घडताच नागरिकांना धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयता हालवले. या हल्ल्यात संदीप गंभीर जखमी झाल्यामुळे पुढच्या उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात हालवण्यात आले आहे.
advertisement
हे ही वाचा : Nagpur News: आधी गाडीला धडक, मग तलवारीने वार; शेतातील पाण्यावरून पेटला वाद अन् घडला कांड!
हे ही वाचा : 'सासरी रहायचंय, तर 20 लाख आण', विवाहितेचा सासू-नणंदेकडून छळ; अमेरिकेतून आला पती आणि...