सुरेखा मारुती सावंत (वय-57, रा. लिंब, ता. सातारा) या राधिका रस्त्यावरून चालत जात असताना, एका लेंगा-टोपी घातलेल्या 60 वर्षीय व्यक्तीने त्यांना हाक मारली. 'तुमच्या पायाखाली काहीतरी पडले आहे,' असे त्याने सांगितले. सावंत यांनी दुर्लक्ष केले, पण त्यानंतर निळा शर्ट घातलेला अंगाने मजबूत असलेला 40 वर्षांचा एक व्यक्ती तेथे आला. त्याने जमिनीवरून एक रुमाल उचलला.
advertisement
तो रुमाल उघडल्यावर त्यात सोन्याच्या रंगाच्या दोन लहान विटा होत्या. त्यातील एक वीट तुम्हाला देतो, असे त्या दोघांनी सावंत यांना सांगितले. त्या बदल्यात त्यांनी सावंत यांच्याकडील दागिने मागितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, सावंत यांनी आपल्या गळ्यातील 5 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 4 ग्रॅमचे सोन्याचे मणी, कानातले सोन्याचे फुले, आणि सोन्याचे वेल असे एकूण 9 ग्रॅम वजनाचे दागिने त्यांच्याकडे काढून दिले.
दागिने घेतल्यानंतर ते दोघे लगेच निघून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, सुरेखा सावंत यांनी 13 ऑक्टोबर रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
हे ही वाचा : जीव सोडला पण साथ नाही, नाशकात प्रेमीयुगुलाने हातात हात घेऊन रेल्वेसमोर मारली उडी
हे ही वाचा : 'त्या' 7 जणांना एका रात्रीत व्हायचं होतं कोट्यधीश, मध्यरात्री 'कुरिअरची गाडी' लुटण्याचा रचला प्लॅन, पण...