'अनैतिक संबंधां'ची माहिती पडली महागात
तक्रारीतील सविस्तर माहितीनुसार, तक्रारदार महिला तिच्या आईसोबत राहते. तिची महसूल सहायकासोबत गेल्या दोन वर्षांपासून ओळख आहे. यामुळे तिला सहायकाची बरीच माहिती होती. महसूल सहायकाचे त्याच्याच कार्यालयातील एका महिला सहकाऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती तक्रारदार महिलेला मिळाली होती. तिने ही माहिती त्या महिलेच्या पतीला फोनवरून दिली.
advertisement
आपल्या पत्नीबद्दल ही माहिती मिळताच पती संतप्त झाला. त्याने तक्रारदार महिलेला गोडोली येथे भेटायला बोलावले. मात्र, ती पोहोचण्यापूर्वीच त्या ठिकाणी महसूल सहाय्यक, त्याची सहकारी महिला आणि इतर नातेवाईक (3 महिला आणि 4 पुरुष) हजर होते.
भररस्त्यात मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी
तक्रारदार महिला गोडोली परिसरात पोहोचताच वादावादीला सुरुवात झाली. त्यानंतर सर्व संशयितांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिचे केस धरून तिला फरफटत नेण्यात आले आणि "तुला जिवंत ठेवत नाही, तुला खलास करणार," अशी जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
इतकेच नाही, तर संशयितांनी तक्रारदार महिलेच्या आईलाही तिथे बोलावून घेऊन पुन्हा मारहाण केली. अखेरीस, आईनेच भांडण सोडवून आपल्या जखमी मुलीला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या प्रकरणी साताऱ्यातील शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा : कोल्हापूर हादरलं! पैशांवरून झाला वाद, पत्नी सांगेना कर्जाचा हिशोब, पतीने काढला चाकू आणि चिरला गळा
हे ही वाचा : नियतीचा अजब खेळ! 5 वर्षांचा संसार, 2 मुलांची आई... पण अल्पवयीन; दुसऱ्यांदा बाप होणाऱ्या पतीवर 'पोक्सो'चा गुन्हा