ही घटना राजस्थानच्या बाडमेरमधून समोर आली आहे. ज्यात एका आईने आपल्या चार मुलांना पाण्याच्या टाकीत फेकलं. मग स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत चारही लेकरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर, महिलेचा जीव वाचवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पहाटे तीन वाजता बसची ट्रॅक्टरला धडक; जालना मार्गावर अपघात, त्या 17 मजुरांसोबत भयंकर घडलं
advertisement
या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, रविवारी जिल्ह्यातील सदर भागातील धने का तला गावात ही घटना घडली. यात एका महिलेने आपल्या चार मुलांना पाण्याच्या टाकीत फेकून दिलं आणि नंतर स्वत:ही पाण्यात उडी घेतली. प्राथमिक तपासात पोलिसांना समजलं की, ही महिला कौटुंबिक वादामुळे त्रस्त होती. यातूनच तिने हे पाऊल उचललं.
बाडमेरचे पोलीस अधीक्षक नरेंद्र सिंह मीना म्हणाले, 'एका महिलेनं पाण्याच्या टाकीत टाकल्याने तिच्या चार मुलांचा मृत्यू झाला. महिलेची सुटका करण्यात आली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमागील कारण जाणून घेण्यासाठी तिची चौकशी करण्यात येणार आहे. टाकीत बुडालेल्या सर्व मुलांचे वय 5 ते 11 वर्षे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती मजुरीचे काम करतो.
