पहाटे तीन वाजता बसची ट्रॅक्टरला धडक; जालना मार्गावर अपघात, त्या 17 मजुरांसोबत भयंकर घडलं
- Published by:Kiran Pharate
 
Last Updated:
या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर 16 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आज पाहटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
छत्रपती संभाजीनगर (अविनाश कानडजे, प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगरमधून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. आज पहाटे ही घटना घडली. जालना मार्गावर कुंभेफळ चौकात हा अपघात झाला. यात बसने मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडक दिली.
या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर 16 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आज पाहटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर सर्व जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं. जखमींवर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
सांगोल्यात भीषण अपघात - 
view commentsसांगोल्यातही घडलेल्या एका अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सांगोला तालुक्यातील बामणी येथे रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की तिन्ही तरुण लांब फेकले गेले. दुचाकी आणि टाटा कंपनीच्या व्हिस्टा कार एकमेकांना धडकल्याने ही घटना घडली. यामध्ये दुचाकीवर स्वार असलेले धिरु कोळेकर, विठ्ठल दिवटे आणि म्हाळापाप्पा धनगर (रा. निपाणी ता चिकोडी बेळगाव) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघात घडल्यानंतर कार चालकाने घटनास्थळावून पळ काढला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 03, 2024 7:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पहाटे तीन वाजता बसची ट्रॅक्टरला धडक; जालना मार्गावर अपघात, त्या 17 मजुरांसोबत भयंकर घडलं


