करीना अली असं हत्या झालेल्या २४ वर्षीय तरुणीचं नाव आहे. तर शमशुद्दीन मोहम्मद खुर्शीद हसीफ असं २४ वर्षीय आरोपी प्रियकराचं नाव आहे. दोघंही मीरा रोड येथील म्हाडा हाऊसिंग सोसायटीमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. करीना बार डान्सर म्हणून काम करत होती. तर शमशुद्दीन पेशाने शेफ आहे. तो मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये काम करतो.
advertisement
प्रेयसीचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शमशुद्दीनला करीनाचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या संशयामुळे त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. गुरुवारी रात्री शमशुद्दीनने करीनाला फोनवर कोणाशी तरी बोलताना पाहिले. तेव्हा त्याला संताप अनावर झाला. यानंतर त्याने रागाच्या भरात शमशुद्दीनने धारदार चाकुने करीनाचा गळा चिरला. करीनाची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
चार तासांत आरोपीला बेड्या
पण घराचा दरवाजा उघडा राहिल्याने आजूबाजूच्या लोकांना संशय आला. त्यांनी लगेच या घटनेची माहिती पोलिसांना माहिती दिली. मीरा रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवला. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या चार तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. या घटनेचा पुढील तपास मीरारोड पोलीस करत आहेत.
