चीनी अभिनेता एलन यू मेंगलोग याचे वयाच्या 37 व्या वर्षी निधन झाले आहे. बीजिंग येथील एका बिल्डिंगमधून पडून त्याचे निधन झाले आहे. 11 सप्टेंबर 2025 रोजी ही दुखद घटना घडली आहे. अभिनेत्याच्या टीमने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. अभिनेत्याच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजसृष्टीसह त्याच्या कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला आहे. अभिनेता बिल्डिंगमधून कसा काय पडला? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
advertisement
अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर
अभिनेत्याच्या निधनाची बातमी त्याच्याच सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आली आहे. यात लिहिले आहे,"आमच्या प्रिय मेंगलोंगला 11 सप्टेंबरला एका दुखद घटनेचा सामना करावा लागला आहे. बिल्डिंगमधून पडून त्याचे निधन झाले आहे. यामागे कोणताही गुन्हा नसल्याचे खंडन पोलिसांनी केले आहे. आम्ही आशा करतो की, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना व मित्रपरिवाराला या कठीण काळाचा सामना करता येवो.
#于朦胧 #YuMenglong #AlanYu Studio's Official Statement.
It was too sudden and everyone in shock 😭
Even I still can't believe this....
Rest in peace, Yu ge 🕯🕊
May you find the beautiful place 🥹 pic.twitter.com/Ft5ZLIjli5
—