रिॲलिटी शोचे किंग-क्वीन पुन्हा आमनेसामने
मिळालेल्या माहितीनुसार, या शोसाठी टेलिव्हिजनचे काही दिग्गज चेहरे कन्फर्म झाले आहेत. यात सर्वात मोठं नाव आहे ते म्हणजे 'ये है मोहब्बतें' फेम करण पटेल. खतरों के खिलाडी आणि झलक दिखला जा गाजवल्यानंतर करण आता या ५० जणांच्या टोळीत काय धिंगाणा घालतो, हे पाहणं रंजक ठरेल.
advertisement
'साहेब सोडा ना...', मुंबई पोलिसांनी थेट Mr, Faisu ची कॉलर धरली, हात जोडून करू लागला विनवण्या, VIDEO
दुसरीकडे, आपली 'सिलबट्टा' क्वीन अर्चना गौतम हिला विसरून कसं चालेल? बिग बॉस १६ मधून घराघरांत पोहोचलेली अर्चना, सेलिब्रिटी मास्टरशेफ आणि जंगल क्वीनसारख्या शोमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करून आली आहे. तिच्यासोबतच रिॲलिटी शोची क्वीन मानली जाणारी दिव्या अग्रवाल देखील या शोचा भाग असणार आहे. 'बिग बॉस ओटीटी'ची विजेती दिव्याच्या चक्रव्यूहात आता हे ४९ जण कसे टिकतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
'मिस्टर फैसू'चा स्वॅग आता टीव्हीवर
इन्स्टाग्रामवर ३३ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स असलेला फैजल शेख ऊर्फ मिस्टर फैसू या शोचं मुख्य आकर्षण असणार आहे. 'टीम ०७' मधून आपल्या प्रवासाची सुरुवात करणारा फैसू आता मोठ्या पडद्यावर आणि रिॲलिटी शोमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज आहे. त्याचा साधेपणा आणि जिद्द त्याला या खेळात किती पुढे नेते, हे पाहण्यासारखं असेल.
काय आहे The 50 चा फॉरमॅट?
हा शो गाजलेल्या फ्रेंच सिरीज 'लेस सिनकांटे' (Les Cinquante) वर आधारित आहे. ५० स्पर्धकांना एका आलिशान महालात बंद केलं जाईल, जिथे कोणताही ठरलेला नियम नसेल. कोणताही नियम नसल्याने इथे प्रत्येक क्षणाला राजकारण, स्ट्रॅटेजी आणि ड्रामा पाहायला मिळेल. या शोचा होस्ट 'द लायन' नावाचा एक रहस्यमयी चेहरा असणार आहे.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रोमोमध्ये बॉलिवूडची दिग्गज कोरिओग्राफर फराह खान सुद्धा चकित झाली आहे. ती म्हणतेय, "रिॲलिटी शोची रिॲलिटी आता बदलणार आहे!" फराहने मस्करीत असंही विचारलं की, भारताच्या इतक्या मोठ्या शोसाठी तिला का बोलावलं नाही?
