पहलगाम हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे एक तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे या चित्रपटाच्या भारतातील रिलीजवर बंदी घालण्यात आली होती. भारताव्यतिरिक्त वाणी कपूरचा हा चित्रपट 12 सप्टेंबरला जगभरात प्रदर्शित करण्यात आला. दिलजीत दोसांझच्या 'सरदार जी 3' या चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपट भारताला वगळून परदेशात प्रदर्शित करण्यात आलेला.
बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टनुसार, 'इंडियन स्टोरीज लिमिटेड (यूके) या टीमने आता हा चित्रपट भारतातील चित्रपटगृहांमध्ये दोन आठवड्यांनंतर, म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांचा या चित्रपटावर विश्वास आहे. या सिनेमात एक गोड प्रेमकथा दाखविण्यात आली आहे. भारतासह संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांना हा चित्रपट आकर्षित करेल. महत्त्वाचं म्हणजे 26 सप्टेंबरल इतर दुसरा कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. निर्मात्यांनी खूप विचार कपूर चित्रपटाच्या रिलीजसाठी हा दिवस निवडला आहे.
advertisement
'अबीर गुलाल' कधी रिलीज होणार?
'अबीर गुलाल' हा एक रोमँटिक विनोदी चित्रपट आहे. प्रेम, नाती अशा नाजूक गोष्टींवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, भारतात हा चित्रपट 26 सप्टेंबरला प्रदर्शित होणार असला तरी अद्याप 'अबीर गुलाल'च्या टीमकडून रिलीजबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. फवाद खान 2026 मध्ये शेवटचा 'ऐ दिल है मुश्किल' या बॉलिवूडपटात झळकला होता. फवाद खान याआधी सोनम कपूरच्या 'खूबसूरत' आणि सिद्धार्थ-आलियासह 'कपूर अँड सन्स' या चित्रपटात झळकला होता. आता आठ वर्षांनी 'अबीर गुलाल'च्या माध्यमातून बॉलिवूड गाजवायला तो सज्ज आहे.