या दुकानात 1500 ते 2000 रुपयांपर्यंतच्या सुंदर साड्या फक्त 750 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. कॉटन साड्या 450 रुपयांपासून मिळत आहेत. दुकानात दररोज नवीन साड्यांचे डिझाइन्स आणि प्रकार दाखल होत असल्यामुळे ग्राहकांना नेहमी फ्रेश आणि वेगळं कलेक्शन बघायला मिळतं. या कलेक्शनमध्ये कॉटन, बनारसी, डोला सिल्क, पारंपरिक पैठणी, कांजीवरम, टिश्यू, पटोला आणि आर्टफिशियल सिल्क अशा विविध प्रकारच्या साड्यांचा समावेश आहे. कॉटन सिल्क साडी 350 रुपयांमध्ये, टिश्यू सिल्क 650 रुपयांना तर पटोला, आर्टिफिशियल सिल्क आणि पैठणी प्रत्येकी 850 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.
advertisement
Navratri 2025: नवरात्रीत तुळजाभवानीचं दर्शन महागलं! मंदिर प्रशासनाच्या प्रसिद्धीपत्रकाने गोंधळ
उत्तम दर्जा, परवडणारे दर आणि विविधतेने भरलेलं कलेक्शन ही नसीम साडी शॉपची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत. यामुळेच वैयक्तिक खरेदीसोबतच अनेक छोटे व्यवसायिक, डीलर्स आणि बुटीक मालक याठिकाणी होलसेल खरेदी करताना दिसतात. नवरात्रीच्या सणासाठी आकर्षक व पारंपरिक साड्या शोधत असाल, तर नसीम साडी शॉपला एकदा नक्की भेट द्या, असा सल्ला अनेक समाधानी ग्राहक देत आहेत. विशेष म्हणजे येथे होलसेल आणि रिटेल दोन्ही प्रकारची खरेदी करता येते त्यामुळे वैयक्तिक वापरापासून व्यवसायासाठी खरेदी करणाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी हे दुकान उपयुक्त ठरत आहे.