अरुंधतीने मनूला तिची मुलगी मानल्यानं आता मनू तिची चौथी मुलगी झाली. अभिषेक, यश आणि ईशा यांच्यानंतर मनू देखील अरुंधतीची मुलगी झाली. पण हिच मनू आता अरुंधतीचा दुसरा संसार मोडण्यासाठी कारणीभूत ठरताना दिसत आहे.
हेही वाचा - लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच नवऱ्याला कॅन्सरचं निदान; तरीही असं केलं सेलिब्रेशन; मराठी अभिनेत्रीचा खुलासा
advertisement
आशुतोष आणि अरुंधती मनूला दत्तक घेण्याची तयारी करत असतात मात्र अशातच मालिकेत मायाची एंट्री झाली. माया ही मनूची टिचर असते. माया आणि मनू यांची चांगली केमिस्ट्री जुळते ज्यामुळे मनू आशुतोष आणि अरुंधती यांच्यापासून दूर जाऊ लागते. हे आशुतोषला अजिबात आवडत नसतं पण केवळ मनूच्या आनंदासाठी अरुंधती मायाची बाजू घेते. अखेर मायाच मनूची आई असल्याचं सत्य समोर येतं.
मायाच मनूची आई असल्याचं कळल्यानंतर आशुतोष मायाला 1 महिना त्याच्यांबरोबर राहाण्याची अट घालतो. आशुतोषच्या अटीनुसार माया केळकरांच्या घरी राहायला येते. पण माया घरात येताच अरुंधती आणि आशुतोष यांच्यात वादाची ठिणगी पडायला सुरूवात होते.
हेही वाचा - अंकुशला कुठे भेटली होती त्याची 'ड्रिम गर्ल'?, Valentains Day आधी शेअर केली खास आठवण
मालिकेच्या येणाऱ्या भागाच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय, माया आणि अरुंधती देवाच्या पुढ्यात शपथ घेतात की, "पंधरा दिवसात मनू जो निर्णय घेईल त्याचा आम्ही मनापासून स्वीकार करू". दोघींचं हे बोलणं एकूण आशुतोष अरुंधतीवर खूप चिडतो. "मी मनूचा बाप झालोय पण तू अजूनही मनूची आई होऊ शकली नाहीस. मला खरं खरं सांग तुला नकोय ना मनू या घरात", असं म्हणत अरुंधतीवर मोठ्यानं ओरडतं. आशुतोषचं हे रौद्र रूप पाहून अरुंधतीला धक्का बसतो.
अरुंधती आणि आशुतोषमधील हे भांडण आता कोणतं टोक गाठणार? मनू अरुंधती आणि माया यांच्यात कोणाची निवड करणार? मनूमुळे अरुंधतीचा दुसरा संसार देखील मोडणार नाही ना? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.