मधुराणी प्रभूलकरने मुंबईत नवं घर खरेदी केलं असून लेकीसोबत या नव्या घरात प्रवेश केला आहे. तिनं आपल्या मेहनतीनं ही स्वप्नपूर्ती केली आहे. घराची झलकही तिनं सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Deepika Padukone Baby : दीपिका पादुकोण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, आई बनल्यानंतर असं आहे रूटीन!
मधुराणीने इन्स्टाग्रामवर या नव्या घराचा व्हिडिओ शेअर करत ही गुडन्यूज दिली. व्हिडिओ शेअर करत तिनं खास कॅप्शनही लिहिलंय. यामध्ये तिनं लिहिलं, "मुंबईत आपलं स्वतः चं घर असावं, आणि तेही विलेपार्ले पूर्व इथेच. हे अनेक वर्षं हृदयाशी जपून ठेवलेलं स्वप्न... ते स्वप्न पूर्ण होणं आणि लेकीच्या साथीनं त्या स्वप्नपूर्तीचा आनंद द्विगुणित होणं हे सगळंच अनमोल आहे."
advertisement
मधुराणीने पुढे लिहिलं, "आज मन कृतज्ञतेने भरून आलंय. आई वडिलांचे आणि सर्व थोरा मोठ्यांचे कृपाशीर्वाद, गुरुकृपा, आणि असंख्य शुभचिंतकांच्या सदिच्छा निव्वळ ह्यामुळेच हे स्वप्न साकारलंय....!!!".
दरम्यान, मधुराणीने नवं घर खरेदी केल्याचा व्हिडिओ शेअर करत सांगताच चाहते आणि अनेक कलाकारांचे व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट पहायला मिळत आहे. अनेकांनी तिला तिच्या या स्वप्नपूर्तीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. तिचं लोक कौतुक करताना कमेंट करत दिसत आहेत.