Deepika Padukone Baby : दीपिका पादुकोण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, आई बनल्यानंतर असं आहे रूटीन!

Last Updated:

दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून नवीनच आई-वडील आपल्या लेकीला घरी घेऊन गेले आहेत. आठवड्याभरात दीपिकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दीपिका हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
दीपिका हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण 8 सप्टेंबरला आई बनली आहे. दीपिकाने एका मुलीला जन्म दिला. रणवीर सिंग आणि दीपिकाच्या घरी चिमुकल्या बेबी गर्लचं आगमन झालेलं आहे. आता दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून नवीनच आई-वडील आपल्या लेकीला घरी घेऊन गेले आहेत. आठवड्याभरात दीपिकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दीपिका रणवीर आपल्या चिमुकल्या लेकीला घराकडे घेऊन रवाना झाले आहेत. याचे फोटोही समोर आले आहेत. अशातच दीपिकाने आपल्या बायोमध्ये बदल केला असून तिने तिचं नवीन रुटीन सांगितलं आहे. दीपिकाने तिच्या बायोमध्ये लिहिलंय, 'फीड, बर्प, स्लीप, रिपीट.' दीपिकाचा बदलेला बायो सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
दीपिका पादुकोणच्या या बायोमध्ये असे दिसून आले आहे की प्रसूतीनंतर ती संपूर्ण दिवस बाळाला खायला आणि झोपण्यात घालवत आहे. दीपिकाचा बायो रेडिटवर व्हायरल होत आहे, जिथे तिची प्रशंसा केली जात आहे. लोक तिला गोंडस आई म्हणत आहेत.
दरम्यान, दीपिकाची डिलिव्हरी डेट 28 सप्टेंबर सांगण्यात आली होती. मात्र आधीच ती आई बनली. दीपिका आणि रणवीर सिंग लग्नाच्या 6 वर्षांनंतर आई-बाबा बनले आहेत. 2018 मध्ये दोघांनी इटलीमध्ये लग्न केलं होतं.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Deepika Padukone Baby : दीपिका पादुकोण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, आई बनल्यानंतर असं आहे रूटीन!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement