या अभिनेत्रीला आई कुठे काय करत मालिकेमुळे नवीन ओळख मिळाली. मालिकेतील तिची भुमिका प्रेक्षकांना आवडली. अरुंधतीच्या लाडक्या सूनेची भुमिका तिने साकारली आहे. आधी एका ऐतिहासिक मालिकेत तिने धाडसी भुमिका साकारली होती. त्यानंतर एका सूनेच्या भुमिकेत दिसली.
advertisement
आपण जिच्याविषयी बोलतोय ती अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. आई कुठे काय करते मालिका संपणार अशी माहिती समोर आली आणि दुसरीकडे अभिनेत्री अश्विनी महांगडे तिचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात ती मळकी साडी नेसून बसली आहे. विस्कटलेले केस आणि खोल विचारात हरवलेली दिसत आहे. अभिनेत्रीची अशी अवस्था पाहून चाहत्यांना धक्का बसलाय.
अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने असा फोटो का शेअर केला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अश्विनीचा हा फोटो तिच्या आगामी प्रोजेक्टमधील आहे. मालिका संपत असली तरी अश्विनी नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अश्विनीच्या नव्या सिनेमाचं शुटींग सुरू आहे. त्याच सिनेमाच्या सेटवरील अश्विनीचा हा फोटो आहे.
"रोज सहावी दुःखे सत्तर, नशिबावरती शिंपडूनी अत्तर...एकच जीवन, एकच संधी, मग जगून पहावे स्वतः सविस्तर", असं कॅप्शन अश्विनीने हा फोटो सर्वांबरोबर शेअर केला आहे.
अश्विनीने काही दिवसांआधीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. अश्विनी अभिनेत्री होण्याबरोबर अनेक सामाजिक कार्यात सक्रीय असते.