मधुराणीने नुकतीच सौमित्र पोटेंच्या'मित्रम्हणे' या पॉडकास्ट चॅनेलमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये तिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींविषयी स्पष्ट मत मांडलं.'आई कुठे काय करते' ही मालिका मिळण्याअगोदर मधुराणीला आणखी चांगल्या संधी का आल्या नाहीत? तिचा तो काळ कसा होता? यावर तिने भाष्य केलं. यावेळी ती म्हणाली, 'तो काळ प्रचंड त्रासदायक, हॉरिबल आणि सहन न करता येणारा, गुदमरणारा होता.'
advertisement
छावाचा डायरेक्टर, बॉक्स ऑफिसचा ‘हिटमेकर’, एकही फ्लॉप सिनेमा नाही!
मधुराणी पुढे म्हणाली, चांगलं काम न मिळण्याचा योग नव्हता आणि माझी चॉईसही त्याला एक कारण असू शकतं. कारण मी अनेक वर्ष जाहीरातीमध्ये काम केलं तर त्यांना वाटत असेल की मी डेली सोप करणार नाही. त्यावेळेला मला जो पर डे मिळाला असता, जे मी महिन्याभरात कमावले असते, ते मला एका जाहिरातीत मिळायचे. त्यामुळे माझं घर तेव्हा त्यामध्ये चालायचं.
'काम तर करायचं होतं, तसं काम बनत होतं, पण मला हवं तसं काम बनत होतं तिथे मी पोहोचू शकत नव्हते. त्यानंतर मी मुलीसाठी काही वर्षांसाठी पुण्यात येऊन स्थायिक झाले. पुणे मुंबई जवळ असलं, अडीच-तीन तासात येत असलं तरी ती दोन वेगळीच शहरं आहेत. तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला मुंबईतच असायला लागतं, हे खरं आहे. नुसता अभ्यास, चिंतन, मनन, निरीक्षण करून उपयोग नाही. कुठेतरी संधी मिळणं गरजेचं आहे. कारण ते करून बघितल्याशिवाय तुम्हाला अभिनय येतो की नाही, हे तुम्हाला कसं कळणार; त्यामुळे प्रचंड प्रमाणातली घुसमट होती, त्रासदायक घुसमट होती', असंही मधुराणी म्हणाली.
दरम्यान, आई कुठे काय करते ही मालिका संपल्यानंतर अभिनेत्रीने सध्या ब्रेक घेतलाय. ती तिच्या मुलीसोबत पुण्यात वेळ घालवत आहे. मात्र ती सोशल मीडियावर सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी कनेक्टेड असते.